मोठी बातमी! रोहित शर्माचा दुखापतीबाबत खुलासा, म्हणाला….

मँचेस्टर,

रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं यजमान इंग्लंडचा 157 रननं पराभव केला. रोहित आणि चेतेश्वर पुजारा यांनी या विजयाचा पाया रचला. त्यानंतर भारतीय बॉलर्सनी त्यांची जबाबदारी पूर्ण करत टीम इंडियाला सीरिजमध्ये 2-1 नं आघाडी घेतली. या टेस्टमध्ये रोहित आणि पुजारा हे दोघंही दुखापतीमुळे चौथ्या इनिंगमध्ये फिल्डिंगसाठी मैदानात उतरले नव्हते.

रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. तर पुजाराचा पायाचा घोटा दुखावलाय. या दोघांच्याही दुखापतीचे स्कॅन करण्यात आले असून याबाबत टीम मॅनेजमेंटनं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे हे दोघं पाचवी आणि शेवटची टेस्ट खेळणार की नाही? याबाबत चर्चा सुरू आहे. पाचवी टेस्ट मँचेस्टरमध्ये 10 सप्टेंबरपासून होणार आहे.

चेतेश्वर पुजाराची दुखापत फारशी गंभीर नाही, अशी माहिती आहे. कारण, या तपासणीनंतर पुजारा धावताना दिसला होता. तर रोहित शर्मानं आता दुखापतीबाबत अपडेट दिलं आहे. रोहितनं चौथ्या टेस्टनंतर ही माहिती दिली आहे. ’दुखापतीचं आकलन प्रत्येक मिनिटाला कर. त्याबाबत पुढचा विचार करु नकोस. असा सल्ला आपल्याला फिजिओनं दिला आहे,’ असं रोहितनं सांगितलं.

रोहितनं चौथ्या टेस्टमधील दुसर्‍या इनिंगमध्ये 127 रन काढले होते. हे त्याचे भारताबाहेरचे टेस्ट क्रिकेटमधील पहिलेच शतक होते. या शतकी खेळाबद्दल ’मॅन ऑॅफ द मॅच’ पुरस्कारासाठी रोहितची निवड करण्यात आली होती. रोहित शर्मा पाचव्या टेस्टपर्यंत पूर्ण फिट न झाल्यास त्याच्या जागी मयांक अग-वालची निवड होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!