कोलंबो एकदिवशीय सामन्यात श्रीलंकेचा दक्षिण अफ्रिकेवर विजय
कोलंबो,
अविष्का फर्नांडो (118) आणि चरीथ असालुका (72) यांच्या शानदार फलंदाजींच्या जोरावर श्रीलंकेने येथील आर.प्रेमादासा मैदानावर खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात दक्षिण अफ्रिकेला 14 धावांने पराभूत करुन तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.
श्रीलंकेचा कर्णघार दासुन शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला आणि त्याचा हा निर्णय योग्य सिध्द झाला. श्रीलंकेने 50 षटकांमध्ये नऊ बाद 300 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 50 षटकात 6 बाद 286 धावा करु शकला.
दक्षिण अफ्रिकेकडून अॅडन मारक्रमने 90चेंडूत पाच चौकार व चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 96 धावा केल्या. श्रीलंंकेकडून अकीला धनंजयने दोन तर चमिका करुणारत्ने, वनिंदु हसरंगा आणि प्रवीण जयाविक्रमाने प्रत्येकी एक गडी बाद केला. फर्नांडोला त्यांच्या शानदार शतकासाठी मॅन ऑफ द मॅचसाठी निवडण्यात आले.
या आधी श्रीलंकेच्या डावात सलामीचा फलंदाज फर्नांडोने शानदार शतकीय डाव खेळत 115 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 118 धावा केल्या. त्याच्या व्यतिरीक्त असालांकाने 62 चेंडूत सहा चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने 72 धावांची खेळी केली तर धनंजय डी सिल्वाने 62 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 44 धावा केल्या.
दक्षिण अफ्रिकेकडून कगिसो रबाडा आणि केशव महाराजने प्रत्येकी दोन. तर तबरेज शमशी आणि अॅडन माक्रमने प्रत्येकी एक गडी बाद केला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली राहिली आणि सलामीचे फलंदाज जानेमन मलाने 23 आणि माक्रमने पहिल्या गडयासाठी 49 धावांची भागेदारी केली. अफ्रिका संघाला पहिला झटका मलानच्या रुपात बसला . त्याला लंकेचा फिरकी गोलंदाज हसरंगाने पायचित बाद केले. मलानने आपल्या डावाच्या दरम्यान 31 चेंडूचा सामना केला आणि यात तीन चौकार मारले.
यानंतर मारक्रमही बाद झाला आणि तो आपले शतक पूर्ण करु शकला नाही. त्याच्या व्यतिरीक्त रैसी वॉन डेर डुसेननने 59 चेंडूत 59 धावा केल्या. यात त्याने सहा चौकार मारले. या नंतर मात्र अफ्रिकेचा एकही फलंदाज करिश्मा करु शकला नाही. दोनीही संघातील दुसरा एकदिवशीय सामना 4 सप्टेंबरला खेळला जाईल.