भारता विरुध्दच्या तिसर्या सामन्यात वेगवान गोलंदाज वुड इंग्लंड संघातून बाहेर
लीडस,
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड भारताच्या विरुध्द येथील हेडिंग्लेमध्ये होणार्या तिसर्या कसोटी सामन्यात खाद्यांला झालेल्या जखमेच्या कारणामुळे संघातून बाहेर गेला आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेंट मंडळ (ईसीबी) ने सोमवारी सांगितले की वुड भारता विरुध्द होणार्या तिसर्या कसोटीत खेळण्यासाठी फिट नाही.
ईसीबीने प्रसिध्द निवेदनात म्हटले की वुड संघा बरोबर लीडसमध्ये असेल आणि रिहेबिलिटेशनमध्ये राहिल. तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर त्याच्या जखमेच्या स्थितीला पाहिले जाईल.
लॉर्डस मैदानावर खेळण्यात आलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात वुडने पाच गडी बाद केले होते. त्याला ॠषभ पंतच्या फटक्याला सीमेवर रोखण्याच्या प्रयत्ना दरम्यान जखम झाली होती. फिजियोच्या तपासनीनंतर तो चौथ्या दिवशी मैदानातून बाहेर गेला होता. मात्र शेवटच्या दिवशी तो मैदानावर उतरला होता आणि चार षटकांची गोलंदाजी केली होती.
वुडच्या व्यतिरीक्त इंग्लंडचे अनेक महत्वपूर्ण खेळाडू जसे की ओली स्टोन, बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब-ाँड आणि जोफ्रा आर्चर विविध कारणामुळे कसोटी मालिकेत सामिल नाहीत.
वुडच्या गैरहजरीत साकिब महमूद तिसर्या सामन्या पासून कसोटीत पदार्पण करेल. मात्र क्रॅग ओवरटोनही अंतिम एकदाशमध्ये सामिल होण्याच्या शर्यतीमध्ये सामिल आहे.
भारत व इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना बुधवार पासून सुरु होणार आहे. भारत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने पुढे आहे.