भारताला मोठा धक्का, शार्दुल ठाकूर दुसर्‍या कसोटीतून बाहेर

लंडन,

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाला एक जबर धक्का बसला आहे. भारतीय संघाचा गोलंदाज शार्दुल ठाकूर या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरला दुखापत झाली होती. यामुळे तो दुसर्‍या सामना खेळू शकणार नाही. बीसीसीआयने याची पृष्टी दिली.

भारतीय संघ पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर या चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता. तर फिरकीपटू म्हणून अंतिम संघात रविंद्र जडेजाला स्थान मिळालं. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरला दुखापत झाली. यामुळे तो दुसर्‍या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. दरम्यान, या सामन्यात शार्दुल ठाकूरने चार गडी बाद केले होते.

पहिल्या सामन्यावर भारतीय संघाने चांगली पकड निर्माण केली होती. परंतु पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पावसामुळे खेळ झाला नाही. त्यावेळी भारताला विजयासाठी 157 धावांची गरज होती. भारताचे 9 गडी शिल्लक होते. पण पावसामुळे भारताच्या विजयाची संधी हुकली. आता शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे दुसरा सामना खेळू शकणार नसल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे. कारण शार्दुल ठाकूर गोलंदाजीसह फलंदाजीत देखील योगदान देणार माहीर आहे.

रोरी बर्न्स, डोमिनिक सिब्ली, जॅक क्रॉउली, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, डॅनियल लॉरेन्स, जोस बटलर, सॅम कुरेन, ओली रॉबिन्सन, स्टुअर्ट ब-ाँड, जेम्स अँडरसन, मार्क वुड, क्रेग ओवरटन, जॅक लीच, डोमिनिक बेस, ओली पोप, हसीब हमीद आणि मोईन अली.

भारतीय संघ –

रोहित शर्मा, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ॠषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल, रिद्धिमान साहा, उमेश यादव, हनुमा विहारी आणि अभिमन्यु ईश्वरन.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!