ऑॅलिम्पिकमध्ये पदके जिंकणार्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव, जाणून घ्या कोणाला काय मिळेल?
टोकियो
6 ऑगस्ट
टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये देशाचे नाव उंचावणार्या खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. ऑॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे सोप्पी गोष्टी नाही. त्यासाठी खूप मेहनत आणि स्वत:वर विश्वास असणं आवश्यक असतं. सोबतच कोट्यवधी भारतीयांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादही सोबत असतात. ऑॅलिम्पिकमध्ये पदक जिंकणार्या खेळाडूंना सरकारकडून काय मिळेल हे जाणून घ्या.
रवी दहिया
रवी दहियावर रौप्य जिंकल्यानंतर बक्षिसांचा पाऊस सुरू झाला आहे. हरियाणा सरकारने 4 कोटी रुपये रोख जाहीर केले आहेत. सोबतच क्लास वन ऑॅफिसर बनवले असून प्लॉटवर 50 टक्के सूट दिली आहे.
रवी दहिया
2015 मध्ये, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने ऑॅलिम्पिक पदके जिंकणार्यांसाठी एक नवीन योजना लागू केली होती. या योजनेनुसार रवी दहियाला रौप्य पदकासाठी 50 लाख रुपये मिळतील.
मीराबाई चानू
ऑॅलिम्पिकमध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये देशाला आणखी एक रौप्य पदक मिळवून देणार्या मीराबाई चानूलाही मणिपूर सरकारने अनेक बक्षिसे देऊन सन्मानित केले आहे. मणिपूर सरकारने मीराबाई चानूला एएसपी बनवले आहे. याशिवाय तिला एक कोटी रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. चानूला केंद्र सरकारकडून 50 लाख रुपये मिळतील.
पीव्ही सिंधू
सलग दुसर्या ऑॅलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणार्या पीव्ही सिंधूवरही बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आंध- प्रदेश सरकारने सिंधूला 30 लाखांचे रोख अनुदान जाहीर केले आहे, तर भारतीय ऑॅलिम्पिक संघटनेने 25 लाखांचे अनुदान जाहीर केले आहे. केंद्र सरकारकडूनही कांस्य जिंकल्यामुळे सिंधूला 30 लाख रुपये मिळतील.
भारतीय पुरुष हॉकी टीम
भारतीय पुरुषांनी 1980 नंतर हॉकीमध्ये देशातील पहिले पदक जिंकले. आता हरियाणा, पंजाब आणि रेल्वेने हॉकीपटूंना बक्षिसे दिली आहेत. पंजाब सरकारने हॉकीमध्ये कांस्य जिंकणार्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले, तर हरियाणाने प्रत्येक खेळाडूला 2.5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
कांस्य जिंकणार्या प्रत्येक खेळाडूला रेल्वे 1-1 कोटी रुपये देईल
हरियाणाने कांस्य जिंकणार्या प्रत्येक खेळाडूला क्रीडा विभागात नोकरी आणि सवलतीच्या दरात भूखंड देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर रेल्वेने कांस्य जिंकणार्या प्रत्येक खेळाडूला 1-1 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे.