बार्सिलोना क्लब, मेस्सी 21 वर्षाची साथ संपुष्टात

नवी दिल्ली प्रतिनिधी

6 ऑगस्ट

बार्सिलोना क्लबचा महान खेळाडू लियोनेल मेस्सी याचे क्लब बरोबरचे 21 वर्षांचे नाते संपुष्टात आले आहे. 30 जून रोजी मेस्सी आणि क्लबचा करार संपला मात्र आर्थिक अडचणीस सामोरे जात असलेल्या क्लबला मेस्सीला निम्मा पगार देणेसुद्धा शक्य नसल्याने हा करार संपुष्टात आला असे समजते. यामुळे आता मेस्सी अन्य क्लब बरोबर करार करण्यास मुक्त झाला आहे.

बार्सिलोना करार संपण्याअगोदर मेस्सीने अर्ध्या पगारावर खेळण्याची तयारी दाखविली होती अश्या बातम्या येत होत्या. गेल्याच महिन्यात अर्जेंर्टिना नेतृत्व करताना मेस्सीने कोपा अमेरिका कप जिंकला आहे. बार्सिलोना क्लब कडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूनी सहमती होऊनही बिकट आर्थिक परिस्थितीमुळे आम्ही नवा करार करण्यास असमर्थ आहोत. क्लब ला 1.8 अब्ज डॉलर्स म्हणजे 8 हजार कोटींचे कर्ज झाले आहे.

वयाच्या 13 व्या वर्षी मेस्सी बार्सिलोना बरोबर जोडला गेला होता. चार वर्षाच्या कडक प्रशिक्षणानंतर अर्जेंर्टिनाचा हा स्टार खेळाडू 2004 पासून बार्सिलोनाच्या सिनिअर क्लब मधून खेळत होता. 2017 मध्ये त्याचा 555 दशलक्ष युरो म्हणजे 4910 कोटींचा करार झाला होता. हे क्रीडा जगतात सर्वात मोठे डील ठरले होते. मेस्सीला एका सिझन साठी 1220 कोटी रुपये मिळत होते.

गेल्या 17 वर्षात बार्सिलोना क्लब साठी मेस्सीने 778 सामन्यात रेकॉर्ड 672 गोल नोंदविले आहेत. मेस्सीच्या नावावर स्पॅनिश लीग मध्ये 520 सामन्यात 474 गोल करण्याची कामगिरी असून त्याने क्लब बरोबर सर्वाधिक सामने खेळण्याचे रेकॉर्ड सुद्धा नोंदविले आहे. मेस्सी सर्वाधिक सहा वेळा, ‘बेलेन डी ओर’ हा खिताब जिंकणारा खेळाडू आहे. अर्जेंर्टिना तर्फे त्याने सर्वाधिक 76 आंतरराष्ट्रीय गोल केले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!