हॉकीपटू वंदना कटारियाच्या घरापुढे फटाके फोडणार्या तीघांना अटक
हरिद्वार प्रतिनिधी
6 ऑगस्ट
ऑॅलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाल्यानंतर फटाके उडवणार्या तीघांना पोलिसांनी अटक केली आहे. शांततेचा भंग केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सिडकुल पोलीस स्टेशनमध्ये एससी एसटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांनाही अटक करण्यात आली आहे. भारतीय महिला हॉकी संघ बुधवारी टोकियोमध्ये सुरू असलेल्या ऑॅलिम्पिक स्पर्धेत अर्जेंर्टिनाचा सामना करत होता. या सामन्यात अर्जेंर्टिनाने भारतीय हॉकी संघाचा 2-1 असा पराभव केला, त्यानंतर येथे ही घटना घडली आहे.
हॉकी प्लेयर वंदना कटारिया यांच्या शेजारी राहणारा विकी पाल याने भारतीय हॉकी संघ हरल्यानंतर वंदना यांच्या घरापुढे फटाक्यांची आतशबाजी केली. त्यानंतर या घटनेची तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर, घटनास्थळी पोलीस हजर झाले. दरम्यान, विकी पालला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी फटाक्यांसह वंदना यांच्यासह आमच्यावर जातीवाचक शब्दांचा वापर केल्याची वंदना यांच्या कुटुंबाची तक्रार आहे.
रोशनबाद गावात राहणारी वंदना कटारिया भारतीय महिला हॉकी संघात खेळत आहे. वंदनाने फक्त उपांत्यपूर्व सामन्यात हॅटट्रिक मारून भारतीय संघाला केवळ उपांत्य फेरीत नेले नाही, तर ती ऑॅलिम्पिकमध्ये हॅटट्रिक करणारी पहिला खेळाडू ठरली आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाने अर्जेंर्टिना संघाला पूर्ण ताकदीने लढत दिली. खडतर सामन्यात भारताचा संघाचा 2-1 ने पराभूत झाला. दरम्यान, वंदना कटारिया यांच्या भावाच्या तक्रारीवरून तीघांना अकट करण्यात आली असून, हरिद्वार पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.