’कॅप्टन कूल’ धोनीला टिवटरकडून मोठा झटका, नक्की काय घडलं?
मुंबई प्रतिनिधी
6 ऑगस्ट
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीला टिवटरने मोठा झटका दिला आहे. टिवटरने धोनीच्या टिवटर अकाउंटवरील ब्लू टीक हटवली आहे. धोनी टिवटर फार सक्रीय नसतो. त्यामुळे त्याच्या अकाऊंटवरील ब्लू टीक काढण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. पण यामागचं नेमकं कारण अजूनही समजू शकलेलं नाही. धोनीने या वर्षी जानेवारी महिन्यात 8 जानेवारीला अखेरचं टिवट केलं होतं. धोनीचे टिवटरवर एकूण 8.2 मिनियन फॉलोअर्स आहेत.
काही वृत्तांनुसार, टिवटरच्या वेरिफिकेशन पॉलिसीच्या नियमांनुसार संबंधित टिवटर युझरने आपलं खातं बदललं असल्यास किंवा 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ सक्रीय नसल्यास ब्लू टीक काढून घेतो. धोनीचं टिवटर खातं बॅन तर केलेलं नाही. मात्र त्याच्या टिवटर अकाऊंटवरील ब्लू टीक काढण्यात आलेली आहे.
ब्लू टीक म्हणजे काय?
सोशल मीडिया पॅल्टफॉर्मवर प्रसिद्ध व्यक्तींच्या नावांनी अनेक फॅनपेज तसेच अकाऊंट तयार केले जातात. पण नेमकं खरं अकाउंट कोणतं आणि फॅन पेज तसेच फेक अकाउंट कोणतं, हे समजत नाही. त्यामुळे प्रसिद्ध लोकांच्या ऑॅफिशिअल अकाउंटला ब्लू टीक दिली जाते.