सावदा येथील जुनाट व जीर्ण विद्युत तारा बदलविण्यासाठी राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची मागणी..

सावदा-

येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते फिरोजखान पठाण यांनी शहरातील ख्वाजानगरसह परिसरातील जुनाट व जीर्ण झालेल्या विद्युत तारा बदलून मिळाव्यात अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
ख्वाजानगरसह परिसरात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असतो. व आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, या भागातील विजेच्या तारा या खूपच जुनाट व जीर्ण झालेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी या तारा तुटून पडल्या आहेत. यामुळे या तारा बदलून मिळाव्यात असे निवेदनात म्हंटले आहे.
याविषयी परिसरातील नागरिकांनी अनेकदा मागणी केली आहे. मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा याबाबत शिफारस केली आहे.
फिरोजखान पठाण यांनी या मागणीचे निवेदन वीज वितरण कंपनीच्या उपअभियंत्यांना दिले असून यावर कार्यवाहीची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!