बागीचा संरक्षण भिंतसाठी जीवंत कडू नींबाचे झाडे नष्ट करण्याचे ठरावास वृक्षप्रेमी कडून हरकत.
सावदा (प्रतिनिधी) –
जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा नगरपरिषदेत दि.१२ रोजी घेण्यात आलेली ऑनलाइन मीटिंगमध्ये दत्त मंदिर बगीच्या गट नंबर ६०२ च्या जागेत संरक्षण भींती बांधकाम करिता अडथळा निर्माण होत असलेले कडु निंबाचे ५ जिवंत हिरवे झाड नष्ट करणेसाठीचा विषयानुसार केलेल्या ठरावास शहरातील दोन वृक्षप्रेमी नागरिकांनी आज नुकतेच मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे घेतली लेखी हरकत.
सदर ठिकाणी संरक्षण भींतीचे बांधकामासाठी प्रत्यक्ष अडचण दिसत असले तरी व्यवस्थित रित्या नियोजनबद्ध पणे विचार केल्यास कडुनिंबाचे जिवंत झाड हे पश्चिम बाजूने अतिशय जुनाट पाताळगंगा असलेली नदी (नैसर्गिक नाला) असून हे निंबाची झाडे त्याच्या व गटनंबर ६०२च्या काठावर असून सदर बगीच्याची संरक्षण भिंत पाताळगंगाच्या पश्चिम दिशेने वाढवली तर नैसर्गिक जिवंत कडूनिंबाची झाडे सह इतर झाडे देखील नष्ट करण्याची आवश्यकता भासणार नाही. व यामुळे “झाडे लावा झाडे जगवा” हे प्रशासनाचे ब्रीद वाक्यचा सावदा पालिका प्रशासनाकडून संवेदनशीलपणे अनुकरण होताना दिसेल. तरी यामुळे बगीच्याची संरक्षण भिंत देखील योग्यरीत्या बांधली जाऊन त्यामुळे नष्ट होणारी कडुनिंबाची झाडे यांनादेखील संरक्षण भिंतीमुळे मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळून जाईल. हे मात्र खरे आहे.
तरी महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चा आधार घेऊन सदरील हिरवे कडुनिंबाचे जिवंत झाडे नष्ट नष्ट करण्याकामी घेतलेला निर्णय नगर परिषद प्रशासनाकडून रद्द बातल करण्यात यावा. म्हणून शहरातील वृक्षप्रेमी शेख फरीद शेख नूरोद्दीन, दिलीप रामभाऊ चांडेलकर यांनी नुकतेच सावदा नगरपालिकेत मुख्याधिकारी किशोर चव्हाण, नगराध्यक्षा अनिता येवले यांना निवेदन देऊन त्यावर तीव्र स्वरूपाची लेखी हरकत घेतलेली आहे.