सावदा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम । सावदा पालिकेस “आसेम” तर्फे प्रतिमा भेट
सावदा (प्रतिनिधी) –
सावदा येथे जमादार वाडयात दी 9 रोजी जागतीक आदिवासी दिना निमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक राजेश वानखेड़े हे होते यावेळी राजेश वानखेडे सह उपस्थित मान्यवर यांनी आपले विचार व्यक्त केले यात नगरपालिका कार्यालयास आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा आसेमं परिवार तर्फे सप्रेम भेट दिली यावेळी बिरसा मुंडा हे जगप्रसिद्ध क्रांतिवीर म्हणून कसे प्रसिद्ध कसे झाले ब्रिटिश सरकार विरुद्ध त्यांचे अन्याया विरुद्ध पेटून उठून त्यांनी कसासंघर्ष केला त्यांचे जंगल रक्षण त्यांचे बिलदान याचा इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे व त्यातून आपण बोध घेतला पाहिजे असे प्रतिपादन करण्यात आले, सावदा गावात आदिवासी तडवी भिल जमाती साठी आसेमं संघटने तर्फे स्वतंत्र कब्रस्तान ची मागणी देखील करण्यात आली, आदिवासींनी बॅनर संस्कृती ऐवजी निसर्ग संस्कृतीशी कायम नाळ बांधावी
,शिक्षण हेच आदिवासींचे विकासाचे धोरण असल्याने शिक्षणाची कास धरा असे विचार यावेळी विचारमंचावरुन मान्यवरानी व्यक्त केले
यांची होती उपस्थिती
नगरसेवक राजेश वानखेडे, नगरसेवक फिरोज खान पठाण, नगरसेविका नंदाबाई लोखंडे, मुख्याधिकारी सौरभ जोशी,स.पो.नी, देविदास इंगोले, शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी, फैजपुर नगराध्यक्ष शेख कुर्बान, हनीफ पिंजारी, मोठा वाघोदा सरपंच मुबारक तडवी,मंडळ अधिकारी संदीप जैसवाल, समाज सेवक गजुभाऊ ठोसरे, संजय चौधरी, यांचे सह मान्यवर अवस्थित होते