विवरे बुद्रुक येथील दुर्गादेवीच्या मुर्तीवरील लाख रुपयांचे आभूषण लंपास
रावेर तालुका प्रतिनिधी:-(प्रदीप महाराज)
विवरे बुद्रुक येथील दुर्गा देवी मंदिरात चोरी झाल्याची घटना दि.३० शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथील पिंपळ खोऱ्यातील दुर्गा मंदिरात चोरी झाल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. या ठिकाणी नित्य नियमाने शंकर सपकाले हे पूजा व आरती करतात,सकाळी ते घरात असतांना, त्यांच्या सुनेला मंदिराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी,याबाबत सासरे शंकर सपकाले यांना सांगितले,त्यांनी मंदिरात जाऊन बघितले असता, देवीच्या मूर्तीवरील चांदीचे मुकुट,छत्री व सोन्याचे आभूषणे असा एकूण लाख रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे दिसून आले,त्यांनी याबाबत शेजाऱ्यांना माहिती दिली,यानंतर घटनास्थळी निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे,व कर्मचारी यांनी धाव घेत पंचनामा केला आहे,याबाबत निंभोरा पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
__________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888