अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत..
तांदलवाडी प्रतिनिधी:-(वैभव महाजन)
दि१६ रोजी रात्री ७ वाजे पासून तर रविवार दि १७ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत संततधार अवकाळी पाऊस पडला. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती . या अता अवकाळी पाऊस व अतिवृष्टि मुळे आधीच शेतकरी यांचे आतोनात नुकसान झाले. परतीच्या पावसाने शनिवारी,रविवारी जोर पकडला होता.यामुळे शेतात पाणी साचले असून परिसरात कपाशी पिकाची मोठी हानी होत असून कापाशीची बोंडे काळे पडून सडले आहेत.ज्वारीही काळी पडून सडणार आहे.शेतक-र्यांचे राहीलेले थोडेफार पिक हातातून जाते की काय त्यात केळीवरील cmv व्हायरस परत वाढतो की काय अशी शंका तांदलवाडी परिसरातील शेतकरी वर्गांमधे दिसून येत् आहे.