कलाशिक्षिका वैशाली खाचणे यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार प्रदान..

रावेर तालुका प्रतिनिधी:- ( प्रदीप महाराज )

सावदा येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था सावदा संचलित, श्री स्वामिनारायण माध्यमिक विद्यालय येथील कलाशिक्षिका वैशाली प्रविण खाचणे यांना शिक्षक ध्येय (नाशिक) संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिक्षक ध्येय मार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले होते या मध्ये राज्यातील अनेक शिक्षक विविध गटातुन सहभागी झाले होते यात वैशाली खाचणे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुरु असताना मुलांना ऑनलाईन पद्धतीनेच थोडा वेगळा मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा पर्यावरण पूरक साहित्य निर्मिती उपक्रम मांडला त्यामध्ये त्यांची निवड झाली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी त्या विविध उपक्रम राबवित असतात हा पुरस्कार त्यांना श्री स्वामिनारायण गुरुकुल संस्था सावदा यांच्या वतीने प्राचार्य संजय वाघूळदे, संचालक पी.डी.पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष परमपूज्य सद्गुरु शास्त्री श्री भक्तीप्रकाशदासजी, उपाध्यक्ष सद्गुरू शास्त्री श्री भक्ती किशोरदासजी खनिजदार सद्गुरू शास्त्री श्री भक्ती स्वरूपदासजी यांनी त्याचे कौतुक केले. मुख्याध्यापिका अश्विनी चौधरी, मुख्याध्यापिका माधुरी भारंबे, गिरीष नेमाडे आणि शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
फोटो:
सावदा (ता.रावेर) : कलाशिक्षिका वैशाली खाचणे यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने गौरविताना संचालक पी. डी. पाटील, प्राचार्य संजय वाघुळदे शिक्षकवृंद आदी.

_______________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!