माँ वैष्णवी गणेश मंडळाचा चा लसीकरणा साठी पुढाकार व प्रमाणपत्र वाटप
रावेर – तालुका प्रतिनिधी ( प्रदीप महाराज )
कोरोनाचा तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रत्येकाने लस घेतली पाहिजे यासाठी पाल येथील माँ वैष्णवी गणेश मंडळाने पुढाकार घेऊन ग्रामीण रुग्णालय पाल यांच्या सहकार्याने लसीकरण करवून घेतले.
जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या लसीकरण मोहिमेत शंभर लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले . तसेच मंडळाच्या माध्यमातून प्रमाणपत्र प्रत काढून वाटप करण्यात आले . प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष पाल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ सचिन पाटील होते मंडळातर्फे मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला डॉ पाटील यानी लसीकरणाला घाबरू नका लसीकरण करून घ्या कोरोना महामारीतून वाचण्याचा एकमेव उपाय म्हणजे लसीकरण म्हणून आपण ही लस घ्या आणि आपले परिवालाही लसीकरण साठी प्रवृत्त करा असे आवाहन केले त्याच बरोबर सौ कल्पना नगरे यांनी लसीकरणा नंतर घ्यावयाची काळीजी बाबत मर्गदर्शन केले
यावेळी डॉ स्वपनिशा पाटील, डॉ मिलिंद जावळे, कार्यालय अधीक्षक जनार्दन चौधरी, दीपक नगरे, विश्वास राव, चंद्रकांत पाटील, अरिहंत पाटील, विशाल पवार,सलीम तडवी, धनराज पवार गणेश भोई,नादर तडवी,कैलास चव्हाण,संजय राठोड युवा सेना तालुका उपरमुख, गौरव चव्हाण मनीष बाविस्कर, जितेश पवार,मगन पवार,प्रवीण चव्हान आदी उपस्थित होते. सुरेश पवार यांनी सूत्र संचालन केले तर आभार राहुल चव्हाण यांनी मानले या कार्यक्रमासाठी गणेश मंडळाचे सदस्ययांनी दोन दिवस गावात लसीकरणा बाबत जनजागृती करून वॉट्सप ग्रुपच्या माध्यमातून लोकांना लसीकरणासाठी परावृत्त केले.
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण रावेर तालुक्यातील बातमी 7887987888 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रदीप महाराज
रावेर तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-7887987888