सातपुड्याच्या कुशीत जिल्हा विधी सेवा समितीचा पुढाकार….विशेष आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीमेसह जन जागृती कार्यक्रम

रावेर प्रतिनिधी :- ( प्रदीप महाराज तालुका प्रतिनिधी 7887987888 )

रावेर –

यावल तालुल्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत जळगाव जिल्हा विधी सेवा समितीच्या पुढाकाराने विविध कार्यक्रम राबविण्यात आले यात आदिवासी विकास विभागाच्या योजना, त्यांचे संरक्षण कायदे, वन्य जिव जन जागृती, आरोग्य तपासणी, कोरोना विषयक जन जागृती व लसीकरण मोहीम आदींचा समावेश होता
रावेर आणि यावल तालुक्यातील गारखेडा, उसमळी, जामन्या, गाडऱ्या आणि लांगडा आंबा याभागातील आदिवासी बांधवांसाठी विशेष शिबिराचे आयोजन जामन्या येथील सातपुडा विकास मंडळ पाल संचलित आश्रम शाळेत करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा समिती सचिव न्या ए ए शेख हे होते. प्रमुख उपस्थिती सागर चित्रे, विजय दर्जी, शरद न्हायदे, उप जिल्हाधिकारी मनोज रावळ, यावाल गट विकास अधिकारी निलेश पाटील, नायब तहसीलदार आर डी पाटील सपोनि श्री पठान हे होते.
कार्यक्रमाचे सुरवातीला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यांनतर गट विकास अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविकात जिल्हा विधी सेवा समितीच्या कामकाजाविषयी सविस्तर माहिती दिली.
रानावनात सर्प दंश झाल्यास करावयाचा प्रथमोपचार या विषयावर सर्प मित्र जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, गौरव शिंदे, कल्पेश तायडे यांनी मार्गदर्शन केले आरोग्य विषयक योजनांची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ बी, बी, बारेला यांनी दिली.
कार्यक्रमास जामन्या पोलीस पाटील, सत्तर सिंग बारेला, सरपंच काशिनाथ बारेला, माजी सरपंच भरत बारेला, प्रताप बारेला, वन्य जीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक अधीक्षक रविद्र ठाकूर. वनपाल ललित सोनार, लालसिंग बारेला, तेरसिंग बारेला, भरत बारेला, दारासिंग बारेला, बिर्ला बारेला, देवसिंग बारेला आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाळकृष्ण देवरे यांनी करून आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रमेश साबळे, प्राथमिक मुख्याध्यापिका हेमलता सावकारे, एम डी नरवाडे, प्रवीण चव्हाण, एस.पी. नामायते, अधीक्षक सुभाष गाढे, एन व्ही ढाके, अनिल तडवी, राजेंद्र कांचोळे, माम्राज पवार, राजेंद्र पाटील, गीरासिंग बारेला,, गणेश प्रजापती, कस्तुरा बारेला, निलेश बारेला, वीरेंद्र बारेला, जमेला तडवी, विठ्ठल मेढे यांनी घेतले
आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ बी. बी. बारेला, डॉ सचिन पाटील, डॉ श्री भोईटे, डॉ श्री ठाकरे, मुख्य अधिपरिचारिका सौ कल्पना नगरे, अधिपारीचारक अरिहंत पाटील, औषध निर्माता पी.एम. पाटील, परिचारिका राबजान तडवी, गोविंद पवार यांच्यासह ग्रामीण रुग्णालय पाल व प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा ता यावल येथील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
चौकट
या शिबिरात जिल्हाधिकारी अभिजित राउत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ बारेला यांनी स्थानिक पावरा भाषेत नागरिकांना मार्गदर्शन करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करवून घेण्याचे आवाहन केल्याने 70 जण लस घेण्यास तयार झाले त्यांना मुख्य अधिपरिचरिका सौ कल्पना नगरे व परिचारिका शाबजान तडवी यांनी लसीकरण केले
ज्या गावात या आधी लसीकरणासाठी अथक परिश्रम करून देखील आदिवासी बांधव लस घेण्यास तयार नव्हते त्या ठिकाणी एकाच दिवसात 70 स्थानिक बांधवांनी लस घेतली ही विशेष बाब आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!