15 व्या वित्त आयोगातून संगणक परिचालकांच्या मानधनाची सक्ती ग्रामपंचायत वर नकोच…सरपंच संघटनेची जि.प. सीइओकडे मागणी.
प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे – Mob- 9922358586 )
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून सरपंच व ग्रामसेवकांना वारंवार सूचना देऊन सन 2021/2022 च्या 15 व्या वित्त आयोगातून संगणक परिचालक यांचे मानधन देण्याचा वारंवार तगादा लावला जातो.
ग्रामपंचायतीत कार्यरत संगणक परिचालकांचे मानधन प्रशासकीय खर्च म्हणून वर्ष 2021/2022 च्या 15 वित्त आयोगातून खर्च करण्याची ग्रामपंचायतीवर जबरदस्ती सक्ती करू नये. अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या रावेर शाखेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या कडे केली आहे.
जो पर्यंत या आयोगाचा निधी ग्रामपंचायत खात्यात जमा होणार नाही तो पर्यंत तालुक्यातील ग्रामपंचायती हे मानधन देणार नाही. अशी भूमिका अखिल भारतीय सरपंच संघटनेने घेतली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे मानधन जमा करण्याची सरपंच, ग्रामसेवकांवर सक्ती करू नये अशी मागणी रावेर सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, ( सिंगत ) सचिव महेंद्र पाटील, गणेश महाजन सरपंच अटवाडा, स्वरा पाटील सरपंच विवरा खुर्द, यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) डॉ. पंकज आशिया यांना केली.