महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायत ग्राम रोजगार यांना ग्रामपंचायत सेवेत कायम करा
रावेर शहर प्रतिनीधी ( ईश्वर महाजन )
दि २आक्टोबर (गांधी जंयती ) त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत ग्राम रोजगार यांना कामस्वरूपी सेवेत घ्यावे यासाठी सपूर्ण महाराष्ट भर महात्मा गांधी यांच्या जंयती निम्मित सर्व तहसिल कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात असून त्या स्वरूपाचे एकदिवसीय उपोषण रावेर तहसिल कार्यालया समोर करण्यात येत आहे
. सविस्तर माहिती अशी की सपूर्ण महाराष्ट्र भर ग्रामपंचायत मधील ग्राम रोजगार संख्या ही २८ १४४ एवढीअसुन राज्य सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व ग्राम रोजगार यांना ग्राम सभेमार्फेत नियुक्ती देण्याचे आदेश दिले आहे त्यानुसार राज्यामध्ये सन २००६ पासून आता पर्यन्त राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवक हे शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या ६ टक्के तोडक्या मानधनावर काम (सेवा) करीत असुन सन २००६ पासून गेल्या १५ वर्षा पासून ग्रामपंचायत मध्ये निवड झाल्यानंतर नवीन ग्रामपंचायत संरपच , उप सरपंच व सदस्य यांची निवड होते ते बऱ्याच वेळा राज्यात संत्तातर झाल्या नंतर सुड बुद्धीने ग्राम रोजगार सेवक यांना प्रोसिडीग व्दारे ग्राम रोजगार (सेवक ) यांना कामावरून कमी करणे, मानसिक त्रास देणे असे प्रकार बन्याच जणांना सामोरे जावे लागत असते कोरोना काळात सुध्दा ग्राम रोजगार यांना उपासमारीची वेळ परीवारावर आली होती भविष्यात अशी वेळ भविष्यात येऊ नये त्यासाठीच महाराष्ट्रातील सर्व ग्राम रोजगार २२१४४ सर्व कार्य स्वरूपी सेवेत घ्यावे त्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करीत आहे या आधी पण दि. २७ सष्टे ला पण निवेदन दिले आहे वेळोवेळी आमच्या वरीष्ठ सहकारी यांनी चर्चा मार्फेत किंवा निवेदन व्दारे दिलेल्या मागणीचा सहानभुती पुर्वेक विचार करावा . अन्यथा पुढच्या वेळेस उग्र आंदोलन महाराष्ट भर करण्यात येईल उपोषणास बसलेल्या मध्ये सुभाष सुकदेव सपकाळे (जिल्हा अध्यक्ष ) ललीत वेडू तडवी (उपाध्यक्ष ) उमेश गोविंदा तायडे (सचीव )जितेद्र आडगावकर, प्रदीप कोचरे , गोपाळ वेडू धनगर, प्रदीप सुभाष पाटील , देवलाल भागवत महाजन असे एकुण ३५ ग्राम रोजगार सेवक यांनी उपोषण केले