कोकण, कोल्हापूर, सांगली सारख्या पूरग्रस्त भागातील बांधवांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मदत..
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी नाना पाटील यांच्या कडून.
भुसावळ : साकेगाव -गेल्या महिन्यात पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी सारख्या जिल्ह्यात मोठा पूर आल्याने, दरड कोसळणे, अशा घटनांमध्ये असंख्य लोक मृत पावलीत, तसेच गावंची गावे उध्वस्त झालीत. लोकांची घरे पाण्यात वाहून गेलीत, कित्येक कुटुंब रस्त्यावर आलीत. असं अस्मानी संकट या बांधवांवर आलेलं असतांना मात्र राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील जनतेच्या पाठीशी असल्याचं वेळोवेळी सांगितलेलं आहे. तसेच 15 हजार कोटींची मदत देखील सरकारने देऊन पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी जाहीर केलेली आहे.
यासोबतच राज्यभरातून विविध क्षेत्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. विविध स्वरूपात लोक मदत करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसही मोठी मदत पूरग्रस्त बांधवाना देत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फेही जिल्हावासीय जनतेला मदतीचं आवाहन केलेलं होतं. म्हणून आज आरोग्य साहित्य तसेच दैनंदिन जीवनातील किराणा साहित्य तसेच विविध स्वरूपात मदत गोळा करून ती साकेगाव ता.भुसावळ येथुन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या टीमद्वारे रवाना करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील,प्रा डॉ सुनीलजी नेवे सर,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेशजी नेमाडे,तालुकाअध्यक्ष दिपक मराठे,शहरअध्यक्ष नितीन धांडे,प्रदेश सदस्य शकील पटेल,युवक जिल्हासरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील,माजी सरपंच विजय पाटील,विकास सोसायटी चेअरमन किशोर भोई,ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील,विलास ठोके,चंद्रकांत कोलते,अजय चौधरी,प्रमोद पाटील,विनोद पवार,गजानन पवार,बाळू पाटील,मंगेश पाटील,युवक शहर उपाध्यक्ष राहुल वाघ,तुषार हळप,अमोल मांडे तसेच असंख्य कार्यकर्ते बांधव उपस्थित होते.