पारोळ्यात प्रदेशाध्यक्षा चाकणकरांचा उपस्थीतीत महिला संवाद मेळावा..

पारोळा प्रतिनिधी –

पारोळा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचा महिला संवाद मेळावा चोरवड रस्त्यावरील विजया लॉन्सवर राष्ट्रवादीचा महिला अध्यक्षा तथा प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकरांचा उपस्थीतीत पार पडला.मेळाव्यात अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिलांशी संवाद साधून मार्गदर्शन केले व राज्यातील महायुती सरकारच्या सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेत माहिती दिली.त्यात महाराष्ट्रातील एक कोटी साठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा अद्याप लाभ मिळालेला असून उर्वरित महिलांनाही हा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे त्या म्हणाल्या की मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही,आवश्यक त्या विकासासाठी मतदात्यांनी आमचावर विश्वास दाखवावा, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी शास्वती ही त्यांनी दिली.यावेळी डॉ.संभाजीराजे पाटील यांनी ही एरंडोल-पारोळा मतदारसंघातील अडचणी व समस्यांबाबत लेखाजोखा मांडून महायुती सरकारच्या योजनांबाबत सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय पवार, पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.महेश पवार,राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, विभागीय युवती अध्यक्षा अभिलाषा पाटील,योगेश देसले, किशोर पाटील,अरविंद मानकरी पारोळा तालुकाध्यक्ष मिनाक्षी भोसले,एरंडोल तालुकाध्यक्ष जयश्री पाटील यांचेसह जिल्ह्यातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!