जागतिक दर्जाचे शिक्षणासह खेळातून प्रशिक्षण देणारी टायगर इंटरनॅशनल स्कूल चा गौरव..
पारोळा प्रतिनिधी –
पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल ही ज्युनिअर केजी ते चौथीपर्यंत शिक्षण देणारी सीबीएससी पॅटर्न नामांकित शैक्षणीक संस्था आहे. या संस्थेत जागतिक दर्जाचे शिक्षणासह आंतरराष्ट्रीय पद्धतीने विद्यार्थ्यांना खेळातून प्रशिक्षण देत शिकविले जाते.सर्वांना माहितीच आहे की आपले पाल्यास शिक्षण प्रवाहात तारेवरची कसरत करावी लागते. पाल्यांमध्ये खेळणं,मोकळेपणा न मिळता सकाळपासून सायंकाळपर्यंत स्कूल व क्लासेस मध्ये ते एवढे व्यस्त असतात त्यामुळे मुलं आनंदी राहणेच विसरले.याचाच विचार करून टायगर इंटरनॅशनल स्कूल चे अध्यक्ष रविद्र पाटील यांनी स्कूलची स्थापना केली.
विद्यार्थ्यांना शिक्षणासह सांस्कृतीक ज्ञान देऊन जागतिक दर्जाचे शिक्षण मिळायला हवे व ते कसे मिळेल यासाठी स्कूलचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी शाळेत शैक्षणीक सह सामाजिक, सांस्कृतीक आणि क्रीडाशील उपक्रम राबबून त्यांच्यात नियमित उत्साह वाढवला.
विद्यार्थी हा शिक्षकाकडून शिकविल्याने तो शिकला पाहिजे असं हे एकविसाव्या शतकात नाही चालणार व त्याद्वारे विद्यार्थी घडवू शकणार नाहीत जर विद्यार्थ्यांना घडवायचे असेल तर विद्यार्थ्यांनी स्वतःहून अभ्यास केला पाहिजे व ते कसं शक्य होईल याचाच विचार करून ‘भविष्य वेधी’ शिक्षण याची मुहूर्त रोवली गेली आणि ती मुहूर्त रोवली माजी शिक्षण महासंचालक नंदकुमार सर यांनी. विद्यार्थ्यांना खेळातून प्रशिक्षण कसे दिले जाईल व ते आवडीने स्वतःहून अभ्यास कसा करतील, जो विद्यार्थी स्वतःहून शिकण्याचा प्रयत्न करतो,तो दहा पटीने शिकतो व जो विद्यार्थी शिक्षकाकडून शिकतो त्याला पुन्हा पुन्हा शिकावे लागते. आजच्या एकविसाव्या शतकात स्वतःहून शिकण्याची पद्धत ही विद्यार्थ्यांमध्ये टाकावी लागेल. त्याच पद्धतीने टायगर इंटरनॅशनल स्कूल ही जागतिक दर्जाचे शिक्षणासह खेळातून प्रशिक्षण देते,प्रत्येक कॉन्सेप्ट ही खेळा द्वारे समजवून प्रॅक्टिकली दाखविते व विद्यार्थ्यांना त्याच्यात इन्व्हाल्व करते.
टायगर इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांना आनंदी बनवायचा आहे,आनंदी बनले तर स्वतःहून अभ्यास करतील व अभ्यास केला तर मार्क्स आपोआप मिळून यशस्वी होतीलच.
- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब,महाराष्ट्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब, महाराष्ट्र राज्य शिक्षण सचिव ए आय कुंदन मॅम,खाजगी सचिव मंगेश शिंदे सर,कक्षा अधिकारी घोरपडे साहेब व इतर मान्यवरांना आपल्या टायगर इंटरनॅशनल स्कूलविषयी अध्यक्ष रविद्र पाटील यांनी सविस्तर माहिती, चर्चा करून आजच्या शिक्षण पद्धती व टायगर इंटरनॅशनल स्कुल हे विद्यार्थ्यांना कसं जागतिक दर्जाचे शिक्षण देत आहे याबाबत पत्र दिले यावेळी त्यांच्या मान्यवरांनी गौरव करून कौतुक व अभिनंदन केले आणि भविष्यात जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी टायगर इंटरनॅशनल स्कूल सदैव तत्पर असल्याचे गौरव्द्गार काढले.