तरुणाच्या विष प्राशनाने मृत्यू..
पारोळा प्रतिनिधी –
शहरातील भोसले गल्ली येथील एका चोवीस वर्षीय तरूणाचा विष प्राशनाने मृत्यू झाला.राकेश आबा मराठे वय २४,रा.भोसले गल्ली पारोळा असे मृताचे नाव आहे.ही घटना ७ रोजी रविवारी दुपारचा सुमारास घडली.
राकेश मराठे याने पोपटनगर शिवारातील परिसरात काहीतरी विषारी औषध सेवन केल्याची माहिती नातेवाईकांसह शहरवासीयांना मिळाली. घटनास्थळी राकेश मराठे याच्याजवळ विषारी औषधाची पिशवी पडलेली होती व त्याच्या नाका तोंडातून उग्र वास येत होता.त्यास रुग्णवाहिकेतून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारा कामी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून सायंकाळी साडेसहा वाजता मृत घोषित केले.याबाबत सतीश खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दरम्यान या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.