विवाहितेचा पाच लाखासाठी छळ – गुन्हा दाखल
पारोळा प्रतिनिधी –
माहेरहून ट्रॅक्टर घेण्यासाठी पाच लाख रुपये आणावे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहितेने फिर्याद दिली आहे की,म्हसवे येथील माहेर व धुळे येथील सासर असुन पती धिरज रामसिंग बाविस्कर,सासू मिराबाई रामसिंग बाविस्कर,सासरे रामसिंग बाविस्कर अशांसह राहते.लग्नाचा काही वर्ष चांगली वागणूक मिळाल्यानंतर पती धिरज बाविस्कर हे रोज दारू पिऊन शिवीगाळ तसेच ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावे म्हणून मारहाण करीत तसेच सासू मिराबाई, सासरे रामसिंग बाविस्कर हे माझाशी नियमित कोणत्याही कारणाने वाद,भांडणे करत माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावून वेळोवेळी मानसिक व शारीरिक छळ करून गांजपाठ करीत. सासरचा जाचाला कंटाळून मी माहेरी आली,त्यानंतर येथेही पती धिरज बाविस्कर,सासू मिराबाई बाविस्कर व सासरे रामसिंग बाविस्कर सर्व राहणार वाल्मीक नगर आसोदा रोड (जळगांव) यांनी शिवीगाळ,मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध आज पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.