पारोळा तालुक्यात १४,९३१ कुणबी नोंदी….
पारोळा प्रतिनिधी –
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यात उपोषण,आंदोलन करण्यात येत होते.याकडील रेकॉर्ड बाबत कुणबी नोंदणी शोधणे साठी शासन स्तरावर सूचना देण्यात आल्या.त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तालुकास्तरावरील कुणबी नोंदीचा शोध घेण्यासाठी समिती कक्ष स्थापन करण्यात आली
यावेळी समिती अध्यक्ष तथा तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा तालुक्यातून तब्बल १४ हजार ९३१ कुणबी नोंदी आढळल्याची माहिती अभिलेखपाल शशिकांत परदेशी यांनी दिली.
तालुक्यातील समिती कक्षाच्या मार्गदर्शनाखाली,अभिलेखपाल शशिकांत परदेशी यांनी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महसूल नायब तहसीलदार एस. पी शिरसाट,मंडळ अधिकारी तथा शहर तलाठी निशिकांत पाटील यांच्या सहकार्याने गावातील कोतवाल यांच्या सहकार्याने जुन्या नोंदणी शोधल्या असता गाव नमुना नंबर १४ यामध्ये जन्म व मृत्यू या नोंदीत १४,८३२ तर कडई पत्रक यात ९९ असे १४ हजार ९३१ कुणबी नोंदी आढळल्या आहेत.
तहसील कार्यालय येथे समिती कक्ष स्थापन झाल्यानंतर कार्यालयातील अभिलेख कक्षात दिनांक ८ नोव्हेंबर पासून नोंदणी शोधण्यास प्रारंभ करण्यात आला.दरम्यान २१ नोव्हेंबर अखेर अभिलेख कक्ष विभागाकडे १४ हजार ९३१ नोंदी
आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.
- दिवाळीच्या सुट्टीत देखील नोंदणी शोधण्यात सातत्य
- राज्य शासनाच्या निर्देशानुसार
तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये तालुकास्तरावर कुणबी नोंद शोध मोहीम राबविण्याचा सूचना देण्यात आल्या.दरम्यान या काळात दिवाळीच्या शासकीय सुट्या असतांना देखील अभिलेखपाल शशिकांत परदेशी व कोतवालांनी सुट्टीच्या दिवशी देखील नोंदी शोधल्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे समिती कक्षाने कौतुक केले आहे.दरम्यान, तालुकास्तरावरील कुणबी नोंदीच्या शोध घेणे कामी समिती कक्षात अध्यक्ष म्हणून तहसीलदार,सदस्य,सचिव म्हणून नायब तहसीलदार महसूल तर सदस्यात उपअधीक्षक भूमी अभिलेख,दुय्यम निबंधक (नोंदणी व शुल्क), गटविकास अधिकारी,गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी नगरपालिका यांचा समावेश आहे.दरम्यान तालुक्यातील कुणबी नोंद शोध मोहीम पूर्णत्वास आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.