पारोळा येथे जयहिंद विद्यालयात विज्ञान प्रदर्शन….
६२ विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग, विवीध उपकरणे केली सादर
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
येथील जयहिंद प्राथमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला.त्यानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात ६२ विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.उद्घाटन संस्थेचे कार्यकारी अधिकारी रोहन मोरे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची उपकरणे सादर केली. उपकरणांची पाहणी करत रोहन मोरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाळेत भरलेल्या विज्ञान प्रदर्शनात,विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागून बाल वैज्ञानिक निर्माण झाला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले तर विज्ञान शिक्षिका सरिता ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिनाविषयी सविस्तर माहिती दिली.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी गेल्या पाच वर्षापासून विद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरविले जात आहे.प्रदर्शन तीन गटात झाले.परीक्षक म्हणून राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्रा.डॉ.पी.जी.बोरसे यांनी काम पाहिले.यावेळी राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी. आर.पाटील,प्रा.डॉ.पी.जी.बोरसे, मुख्याध्यापिका सुरेखा पाटील, अर्चना जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी किशोर पवार,हंसराज देशमुख, संगीता पाटील,सरिता ठाकरे, गुणवंत चौधरी,किरण विसावे, सागर कुमावत,माधुरी पवार, सोनाली पाटील,प्रिती बोरसे यांनी परिश्रम घेतले.
प्रदर्शनात यांच्या सहभाग
पाचवी गटातून सुर्यमंडल विषयावर श्रावणी बनकर ( प्रथम),नेलपॉलिश ज्वलनशील यावर पूजा चौधरी (द्वितीय),यश भोई,लिंबू सोड्यात फुगा फुगतो (तृतीय),सहावीतून दामिनी बारी, पर्यावरणास अनुकूल सामग्रीत (प्रथम),गौरव भोई,व्हॅक्युम क्लिनर (द्वितीय),दामिनी चौधरीचा चिली कटर (तृतीय),
सातवीतून गणेश चौधरीचा जेसीबी उपकरणास (प्रथम), तेजस महाजन,पाण्यातून विद्युत निर्मिती,(द्वितीय),तेजस केदारचा थ्री डी होलोग्राम (तृतीय) तर तिसरीच्या भूमिका महाजन, जयेश महाजन यांच्या उपकरणांना उत्स्फूर्तपणे सहभागीने रोख स्वरूपात बक्षिस देऊन गौरविण्यात आले.