बस स्थानकात वृद्धाला लुटले – तीस हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार….
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
मेंढ्या विकून आलेले पैसे हे घरी घेऊन जाण्याच्या आधीच पारोळा बस स्थानकात दुपारी बारा वाजेच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी वृद्धाला घेरून अधिकारी बतावणी आहोत सांगुन तीस हजार रुपये घेऊन पसार झाल्याची घटना घडली,बस स्थानकात हा प्रकार भरदिवसा घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
आमडदे ता.जि.धुळे येथील नाना बाळू धनगर (५५) हे मेंढी पालनाचा व्यवसाय करतात.सध्या एरंडोल तालुक्यात त्यांचा वाडा आहे.आपल्या वाड्यातील काही मेंढ्या विकून त्यांना साठ हजार रुपये मिळाल्याने ते घेऊन घरी जात होते तत्पूर्वी पारोळा येथील एका सराफ दुकान दाराकडे आपले तीस भार चांदीचे कडे सतरा हजार रुपयात गहाण ठेवलेले होते हे कळे सोडवण्यासाठी ते पारोळा येथे उतरले व त्या सराफ दुकानदाराला सतरा हजार रुपये देऊन आपले चांदीचे कडे सोडवले व एरंडोल कडे जाण्यासाठी पारोळा बस स्थानकाकडे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ आल्यावर,पल्सर गाडीवर दोन अज्ञात तरुण आले व वृद्धाला म्हणाले की तुमच्याकडे गांजा आहे तुमची झडती घ्यायचे असे म्हणताच वृद्धाने त्याच्या खिशातून तीस हजार रुपयांचे तीन बंडल काढून दाखवले ते घेऊन क्षणातच चोरटे फरार झाले,वृद्धा जवळ असलेली तेरा हजार रुपये रोख व चांदीचे कडे मधल्या खिश्यात असल्याने सुखरूप राहिले,मेंढी व्यवसायातून कष्टाचा कमवलेला पैसा गेल्याने वृद्धाला रडू कोसळले,घाबरलेल्या वृद्धाच्या तोंडातून काही क्षण आवाज निघत नव्हता यावेळी इतरांनी व उपस्थित होमगार्ड यांनी वृद्धास विचारपूस केली असता त्यांनी झालेली आपबीती सांगितली. लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,विजय भोई,मराठे आदी पोलिसांनी धाव घेतली व सर्वत्र शोधाशोध केली,नाकाबंदी केली, वायरलेस वर इतर तालुक्यांच्या हद्दीतही मेसेज रवाना केले परंतु चोरट्याने शहर सोडले म्हणून पोलिसांच्या हाती मिळू शकला नाही याबाबत पारोळा पोलीसांची शोध मोहिम चालू आहे.वृद्धांचां फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.