देवगाव कन्येस ‘माहेरची साडी’ भेट….

सरपंच समीर पाटील यांच्या संकल्पनेतून दोन अनोख्या योजना,अनेकांनी केले कौतुक..

जानवे ता.अमळनेर : देवगाव येथील कन्या हर्षदा हिला माहेरची साडी भेट देताना सरपंच समीर पाटील, आधार पाटील,दाजभाऊ पाटील व ग्रामस्थ

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

तालुक्यातील देवगाव येथील ग्रामपंचायतीने नूतन वर्षाचे औचित्य साधत मुलीचे स्वागत करण्यासाठी ग्रामलक्ष्मी व माहेरची साडी योजना जाहीर केली होती त्या नुसार १४ फेब्रुवारीला या योजनेच्या प्रारंभ करण्यात आला असून त्या पार्श्वभूमीवर कैलास पाटील यांची मुलगी हर्षदा हिच्या विवाह निमित्त तिला अकराशे रुपयांची पैठणी साडी जानवे ता.अमळनेर येथे लग्नाला जाऊन सरपंच समीर वसंतराव पाटील यांनी दिली,यावेळी शेतकी संघ संचालक आधार पाटील, दाजभाऊ पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. योजनेअंतर्गत लाभ मिळाल्याने वधूपिता व ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत अनेकांनी कौतुक केले.

सरपंच समीर पाटील यांच्या संकल्पनेतून,समाजाची मानसिकतेत बदल घडून मुलींच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी ही योजना ग्रामपंचायतीने सुरू केली आहे, तसेच मुलींचा जन्मदर वाढावा, सन्मानाने व आदराने या जगात तिचे स्वागत करावे,म्हणून अकराशे रुपये नवजात कन्येस व गावातील मुलीचे लग्न झाले तर त्या नववधूस अकराशे रुपयांची पैठणी ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येणार असल्याचे सरपंच समीर पाटील यांनी जाहीर केले होते. दोन्ही योजनेमुळे मुलींच्या गर्भाशयातील हत्या थांबण्यास मदत होईल तसेच मुलींच्या लग्नात आदराने बघण्याचा दृष्टिकोन या निमित्ताने समाजात तयार होईल,असा विश्वास देवगावचे सरपंच समीर पाटील, उपसरपंच सुधाकर पाटील,ग्राम विस्तार अधिकारी सुनील मोरे व ग्रामपंचायत सदस्यांना आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!