गणेश मंडळांची नेमणुक सदस्य कमिटीतर्फे भेट देऊन पाहणी ….

पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )

आज ९ रोजी अनंत चतुर्दशी निमित्ताने शहरातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळ विसर्जनासाठी सज्ज असून श्री गणेशाला भक्तांतर्फे निरोप देण्यात येणार आहे त्यानिमित्ताने पारोळा शहरातील गणेश मंडळांना तहसीलदार अनिल गवांदे,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे,नगरपालिका मुख्याधिकारी ज्योती भगत,वरिष्ठ पत्रकार भुपेंद्र मराठे ,किसान कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक प्रदीप औजेकर या नेमलेल्या ५ सदस्यीय कमिटीने भेटी देऊन शासनाचा नियमानुसार ज्या मंडळांनी पर्यावरण पूरक मूर्ती,ध्वनिप्रदूषण विरहित सामाजिक सलोखा प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळी संदर्भात देखावे,वैद्यकीय आरोग्य शिबीर,शाळकरी विद्यार्थी शैक्षणिक देखावे,सांस्कृतिक कार्यक्रम,पारंपरिक खेळाच्या स्पर्धा,स्वच्छता अभियान अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजन केले असतील अशा मंडळांना नेमण्यात आलेली ५ सदस्यीय कमिटीतर्फे पाहणीकरून मार्क ( गुण ) दिले जाणार आहे तसेच ज्या मंडळाला जास्त मार्क मिळणार त्यास प्रथम,द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढून त्यांना बक्षीस देण्यात येणार आहे तसेच गणेश मंडळांना कुठलाही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही यासाठी विसर्जन मार्गाची व स्थळाची पाहणी देखील करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!