देवगांव येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती शाखेचे उध्दाटन..
पारोळा प्रतिनिधी – ( प्रकाश पाटील )
देवगांव ता पारोळा येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती शाखेचे उद्धाटन राष्ट्रीय अध्यक्ष मा.प्रदिप पाटील (बाबा खंडापूरकर )यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय प्रवत्का सुनिता ताई कसबे,राष्ट्रीय समन्वयक गिरीराज महिराश,विधीविभाग प्रदेश अध्यक्षा अँड राणीताई स्वामी,विधीविभाग अध्यक्ष विजय पवार,आय टी विभाग अध्यक्ष संतोष ठाकरे,उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रविण बोरसे, धुळे जिल्हाध्यक्ष अनिल देसले, जळगाव जिल्हाध्यक्ष तथा सरंपच समिर पाटील,महेश पाटील उपस्थित होते.तसेच ग्रामीण अध्यक्ष धनंवत निकम,उपाध्यक्ष गोकुळ सत्तावीस,जगदीश पाटील, प्रशात मराठे,संदीप महाजन, पंकज पाटील,पुजेश गोसावी,रवींद्र जाधव, कृष्णानंद शिंदे, भाऊसाहेब पाटील, परशुराम पाटील,सोपान पाटील,विलास पाटील,,राजेंद्र पाटील, योगेश पाटील,अविनाश शिंदे, रामकृष्ण पाटील,जगदीश पाटील, अविनाश पाटील, सुभाष पाटील,समिर निकम,नामदेव पाटील,कल्पेश शिंदे यांची देवगाव ग्रामीण अखील भारतीय निर्मूलन संघर्ष समिती शाखा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यावेळी ह भ प सत्यवान महाराज यांनी आपले अनमोल विचारांचे उपस्थितांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले.संस्थापक तथा अध्यक्ष प्रदिप पाटील (बाबा खंडापूरकर) हे ह भ प सत्यवान महाराज यांच्या प्रेमळ शब्दांनी व विचारांनी आकर्षित होत भारावून गेले व सांप्रदायिक मंडळाचे अध्यात्मिक तालुकाध्यक्ष पदाचा कार्यभार देत,ह भ प सत्यवान महाराज देवगावकर यांना संस्थापक प्रदिप पाटील ( बाबा खंडापूरकर ) यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.तसेच तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील यांनी संघटना स्थापन व्हावी व संघटनेचा माध्यमातून आपल्या ग्रामीण भागाला कोणत्या प्रकारे फायदा होणार यामागील हेतू , उद्दिष्ट ग्रामस्थांना पटवून देत आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुक्यात व गावात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून संघटनेने पुढे यावे व भ्रष्टाचार उघड करण्यासाठी गावात कोणालाही अडचण आली किव्वा अधिकारी व पदाधिकारी यांच्या मुळे कामात अडथळा निर्माण होत असेल तर आम्ही, आमची संघटना यासाठी तत्पर राहील व येणाऱ्या काळात गावात भ्रष्टाचार नाहीसा होऊन गाव भ्रष्टाचार मुक्त होणार असे प्रतिपादन प्रदिप पाटील ( बाबा खंडापूरकर ) यांनी पदाधिकारी व स्थायिक ग्रामस्थांना केले.
या प्रसंगी सरपंच समीर पाटील,धनंजय पाटील,भास्कर पाटील, प्रदिप पाटील, पोलीस पाटील, व गावातील तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन प्रवीण बोरसे यांनी केले तर आभार तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील यांनी मानले.
__________________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण पारोळा तालुक्यातील बातमी या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
प्रकाश पाटील
पारोळा प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”