हर घर दस्तक अभियानाला लासलगावला उत्साहात प्रारंभ..
निफाड प्रतिनिधी – ( रामभाऊ आवारे )
संपूर्ण विश्वाला हादरून टाकणाऱ्या तोरणाच्या संभाव्य लाटेचा विचार करता सर्वांना लसीकरण करणे महत्त्वाची असल्याने शासनाने एक पाऊल पुढे टाकत घरोघरी जाऊन वशीकरण करण्याचे आदेश दिले असल्याने लासलगावला या हर घर दस्तक या अभियानाला अभूतपूर्व वातावरणात प्रारंभ करण्यात आला असल्याची माहिती कोवीड- १९ टास्क फोर्स समुपदेशक फोर्स समुपदेशक तथा ब्राह्मण महासंघाच्या प्रदेश कार्याध्यक्ष सौ स्मिता कुलकर्णी यांनी दिली आहे. प्रत्येक गावातील
100% लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रत्येक घरात जाऊन संपर्क करून कोव्हीशिल्ड लस देण्यास प्रारंभ झाला असून जे जे लोक लसीकरणापासून वंचित आहेत त्या सर्वांनी लसीकरण करून घेऊन सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी निमगाव वाकडा आरोग्य सेवक कल्पेश महाजन ,राजेदा फत्रूमिया काद्री सिस्टर, भाजपा मंडल अध्यक्ष सौ स्मिता कुलकर्णी ,आशावर्कर अर्चना सोनवणे, संगीता गरुड, गणेश जोशी, श्वेता आब्बड, सीमा भागवत ,सचिन बाकलीवल उपस्थित होते.
@@. तळागाळातील सर्वांना लसीकरण याचा लाभ मिळाला पाहिजे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने खारघर दस्तक अभियान सुरू करून आरोग्य विभागामार्फत राबविण्यास प्रारंभ केला असून अजूनही लसीकरणापासून वंचित असलेल्या नागरिकांना लाभ देण्यासाठी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असून या लसीकरणाचा सर्वांनी लाभ घ्यावा.
सौ स्मिता कुलकर्णी.कोव्हीड टास्क फोर्स समुपदेशक..