आई ,वडील व गुरुजन हेच खरे आपल्या जीवनाचे शिल्पकार– मा प्राचार्य शांताराम दरेकर

निफाड प्रतिनिधी – ( रामभाऊ आवारे )

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आपले आई-वडील व गुरुजन यांना अनन्यसाधारण महत्त्व असून आपल्या जीवनात हा खऱ्या अर्थाने पायाभरणी करणारे हे मुख्य आधारस्तंभ आहेत आई वडिलांनी दिलेल्या संस्कारांनी व गुरुजनांनी दिलेल्या शिकवणीने मनुष्य यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करत असतो. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी आई-वडिलांचे आशीर्वाद व गुरुजनांची शिकवण अत्यंत महत्त्वाची असून आई- वडील व गुरुजन हे आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आहे असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य शांताराम माधवराव दरेकर (विंचूर) यांनी व्यक्त केले आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या वनसगाव तालुका निफाड येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य शांताराम दरेकर होते.तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ए एम शिरसागर, प्राध्यापक बी जी माने (सांगली), सेवानिवृत्त पर्यवेक्षक प्रा बी एल राठोड(परभणी), प्रा विलास जगताप, प्रा सुभाष पाटील, वनसगाव विद्यालयाचे प्राचार्य भागचंद निकाळजे, प्राचार्य प्रकाश कडाळे( टाकळी विंचूर), सेवानिवृत्त शिक्षक एन बी गवळी, सेवानिवृत्त शिक्षिका सौ हिराबाई दरेकर, प्रा.घोटेकर, केंद्रीय पत्रकार संघाचे संघटक पत्रकार रामभाऊ आवारे सर,सौ.गवळी,सौ घोटेकर, शिवाजी कोकाटे आदी होते.
सुरुवातीस उपस्थित मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील, सरस्वती व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. यानंतर दिवंगत वर्ग मित्र- मैत्रीणींना श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर उपस्थितीत शिक्षकांनी व माजी विद्यार्थ्यांनी एक साथ राष्ट्रगीत व प्रार्थना घेतली. यावेळी तीनही बॅचच्या वतीने उपस्थित सर्व माजी मान्यवर शिक्षकांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयातील माजी विद्यार्थी ॲड संतोष गायकर यांनी शिक्षक आणि शाळा हे विद्यार्थ्यांसाठी ऋणानुबंध असतात ते व्यक्त करण्यासाठी तसेच जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वनसगाव येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात सन १९९३,१९९४ तसेच १९९८ च्या इयत्ता दहावीच्या व १९९५ एच एस सी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थी मनोगत विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ.अर्चना आवारे (आडके) यांनी स्नेहमेळावा, मैत्रीचे महत्व , तसेच शालेय जीवनातील काही कटू गोड प्रसंग विषद करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच यावेळी सौ वर्षा डुंबरे (कुशारे), बापू पोटे ,डॉ उत्तम शिंदे,
भाऊसाहेब माळी, अमित भोसले, ॲड संतोष गायकर या मा विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .त्यानंतर सेवानिवृत्त माजी पर्यवेक्षक प्रा बी एल राठोड, मा प्राचार्य अशोक क्षीरसागर, प्रा बी जी माने, सेवानिवृत्त शिक्षक एन बी गवळी , विद्यालयाचे प्राचार्य निकाळजे बी डी यांनी मनोगत व्यक्त करताना वनसगाव शिक्षक शिक्षण प्रसारक मंडळाची दिवंगत महिफत आण्णा डुंबरे, कै संतु पाटील डुंबरे (आबा) यांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत विठ्ठलराव शिंदे, राणुजी कापडी व इतर शिक्षण प्रेमींचा यावेळी उल्लेख करण्यात आला.तसेच सेवानिवृत्त आदर्श शिक्षक एन बी गवळी यांनी आपल्या मनोगतात यापैकी अनेक शिक्षकांनी पगार नसतांनाही शिक्षणाचे धडे कसे गिरवले,शाळेची इमारत बांधकामासाठी केलेली मदत,कॉलेजच्या परवागनी साठी आलेल्या अडचणी,ग्रामस्थांकडून मिळालेले सहकार्य तसेच विद्यार्थ्यांचे मिळालेलं प्रेम यावेळी उपस्थितीत विद्यार्थ्यांना मनोगतातून अनुभव कथन केले.अनुभव कथन करतांना बरेच शिक्षक भावुक झाले होते.
यावेळी बापू पोटे, अर्चना आवारे, गोरख कापडी, मनिषा शिंदे,बाळासाहेब गारे, धनंजय शिंदे, सुभाष जाधव, द्वारकानाथ शिंदे, दौलत कापडी, रामदास लभडे,सविता भोसले,मंगल चौभे, मंगेश वाबळे,भाऊसाहेब शिंदे,भाऊसाहेब जेऊघाले, योगेश करेकर, ज्ञानेश्वर क्षिरसागर, संतोष कापडी, कृष्णा शिंदे, संदिप निरभवणे, किर्ती भालेराव,वंदना शिंदे, आशा कापडी, मंदा डुंबरे, योगिता शिंदे, डॉ उत्तम शिंदे, डॉ रावसाहेब जाधव,संजय कापडी, योगेश शिंदे, दिपक घायाळ, अनिल शिंदे, आत्माराम शिंदे, अशोक शिंदे गंगासागर शिंदे, दत्तात्रेय राजाराम शिंदे, लक्ष्मण शिंदे,अमित भोसले, ललित भोसले, योगेश शिंदे, जगन शिंदे , अंबादास झुरडे, विशाल जावळे ,संजय वाघ, किशोर केदारे, धनंजय कापडी, छोटुकाका शिंदे, मनीषा करडक, बेबी गवंडे, शारदा डुंबरे, रामनाथ पोटे, सुनील माळी ,अरुण शिंदे, नंदु घोरपडे, बाळु कापडी, शरद शिंगाडे, सतीश शिंदे, दिलीप शिंदे , सुनिल घोरपडे, माधवराव शिंदे, अनिल शिंदे, सुरेखा जेऊघाले, ज्योती शिंदे ,संगीता दगु शिंदे, कमल शिंदे, सतिश चौधरी, हरीश दशरथ शिंदे, वैशाली शिंदे, वैशाली शिंदे , अंकुश पाचरणे, संतोष शिंदे, दत्तात्रय गणपत शिंदे, संतोष कापडी, मधुकर शिंदे , दत्तू भोसले ,बाबाजी जेऊघाले,अण्णासाहेब कापडी, शांताराम शिंदे, संजय निचीत, पंडित कापडी, राजेंद्र शिंदे नयन कुशारी भाऊसाहेब गयाजी शिंदे, योगिता शिंदे ,महेश शिंदे ,ज्योती ढोमसे,संगिता केदारे, दिपाली धीवर, सोमनाथ शिंदे, केशव नवले, अनिल चौधरी,प्रकाश जेऊघाले ,अशोक गांगुर्डे, धनंजय डुंबरे ,किरण शिंदे, शंकर गारे, संतोष लोहार, मोहन येलवंडे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष गायकर ,डॉ उत्तम शिंदे ,धनंजय कापडी,छोटुकाका शिंदे, सुभाष जाधव, लक्ष्मण शिंदे, बापू पोटे,गोरख कापडी, डॉ रावसाहेब जाधव, अर्चना आडके, द्वारकानाथ शिंदे, धनंजय शिंदे, भाऊसाहेब शिंदे,दौलत कापडी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड संतोष गायकर यांनी मानले.

@@ मैत्रीचा सहवास…..आपलेपणाची ओढ…..रमलेले मन…..अन आठवणीतले चार क्षण…..म्हणजेच”
गेट टुगेदर या स्नेह मेळाव्यासाठी १९९२,१९९३ (दहावी) ,१९९४-९५ (१२वी) व १९९८ (दहावी) या बॅचेस चे
या संस्मरणीय भेटीच्या निमित्त सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि शिक्षकवृंद ,आदर्श पत्रकार आवारे सर हे सर्व गृपच्या विनंतीला मान देऊन वनसगाव येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उपस्थित राहुन सर्वांनी आपलाच कार्यक्रम समजून सहकार्य केले त्याबद्दल गृप तर्फे सर्वांचे अभिनंदन व आभार —


डॉ उत्तम शिंदे.पिंपळगाव बसवंत.–

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!