वीज पडून मृत्यू ,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना व पूरग्रस्तांना शासनाच्या मदतीचे चेक वाटप..
जि प अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते वारसांना अनुदान वितरण
निफाड प्रतिनिधी– ( रामभाऊ आवारे )
माहे ऑक्टोबर २०२१ रोजी गुलाब चक्रीवादळामुळे निफाड तालुक्यात विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात झालेल्या वीज पडून दोन मृत्यू झाले होते या घटनेत शिवडी येथील श्रीमती मंगला भाऊसाहेब क्षीरसागर वय ४५ शिरवाडे वणी येथिल विभा महेश जाधव वय ३८ या दोन शेतकरी महिलांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी रक्कम रु.४ लक्ष मदतीचा धनादेश तसेच, तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत निवड झालेल्या कोठूरे येथील सुलोचना गणपत वाघ व शिवरे येथील लता वसंत पवार यांना प्रत्येकी रक्कम रु.२० हजार अनुदानाचा धनादेश तर कगोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे चांदोरी, सायखेडा व नदीकाठच्या छोट्या मोठ्या व्यवसायकीच्या झालेल्या नुकसानची नुकसानभरपाईचा धनादेश निफाड तहसिल कार्यालयामध्ये आमदार दिलीपराव बनकर यांच्या हस्ते दि १ नोव्हेंबर २०२१ रोजी देण्यात आले याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तहसीलदार शरद घोरपडे, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष कराड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र बोरगुडे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, प्रदेश सरचिटणीस सागर कुंदे, शिवाजीराव ढेपले, इरफान सय्यद, मधुकर शेलार, शिवाजी बोरगुडे, कचेश्वर दुसाने, जावेद शेख, राजेद्र कुटे, शंकर कर्डीले, बापू कापसे, बाळासाहेब रंधवे, किरण पानगव्हाणे, दिलीप कापसे आदी उपस्थित होते.
__________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !