मानव स्पर्श सेवाभावी संस्थेच्या वतीने वेळापुर जि.प शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप-

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर येथे मानव स्पर्श सेवाभावी संस्था लासलगाव यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायण पालवे सरपंच ग्रामपंचायत वेळापूर हे होते . मानव स्पर्श सेवाभावी संस्थेच्या कार्याची माहिती सुनील देवढे यांनी आपल्या प्रास्ताविकातून दिली.
या प्रसंगी मानव स्पर्श सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील वाघचौरे ,कार्याध्यक्ष अरुण देवढे सर, सूर्यकांत जाधव , सचिव समीर देवढे ,खजिनदार सुनील देवढे , संस्थेचे सदस्य योगेश न्याहारकर , सोपान जाधव , केशव जाधव ,डॉ.शशिकांत देवढे, ज्ञानेश्वर देवढे ,सौ.सुरेखा देवढे , ज्ञानेश्वर शिंदे तसेच गावाचे उपसरपंच सौ.माया किशोर कुटे ,शा.व्य.समिती अध्यक्ष संतोष कुटे ,उपाध्यक्ष जालिंदर भागवत, केदुजी शिंदे, ग्रां. प. सदस्य सौ.अर्चना.एकनाथ कुटे, किशोर कुटे सतिष शिंदे, भावडू पवार, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री.सचिन शेलार यांनी केले व आभार श्री.गणेश ठाकरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका श्रीमती माया भावसार तसेच सौ संगीता लहाने ,सौ. वाल्याबाई शेरेकर यांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!