शासनाने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी….
शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद केल्यास ऊर्जामंत्र्यांचे रस्त्यावर उतरून पुतळा दहन करणार—
निफाड प्रतिनिधी–(रामभाऊ आवारे)
आज लासलगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हा बैठक पार पडली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावर शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर ती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये सखोल चर्चा झाली यामध्ये शासनाने जी कर्ज मुक्ती यादी त्यामध्ये उर्वरित रक्कम भरली भरूनही शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची कर्जमुक्ती मिळाली नाही. शेतकऱ्यांची दिवाळी नाही झाली तर शासनाची दिवाळी केल्याशिवाय राहणार नाही अशा भाषेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख श्रावण देवरे यांनी सांगितले. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्याचे काम वीज वितरण कंपनीचे जोरात चालू आहे वीज कनेक्शन तोडणे बंद करावे अन्यथा रस्त्यावर उतरून उर्जा मंत्री यांचा पुतळा दहन करण्यात येईल असे जिल्हाप्रमुख मा. राजू शिरसाठ यांनी सांगितले. केंद्र सरकारने एफ आर पी तीन टप्पे देण्याचा जो निर्णय घेतला आहे या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णपणे विरोधात आहे. आज नाशिक जिल्ह्यातील जिल्हा बँकेत शेतकऱ्यांची जमीन लिलाव चालू आहे यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निफाड तालुका अध्यक्ष राम राजोळे यांनी सांगितले की, आधी संचालकांच्या जमिनीचे लिलाव करा यांनीही कोटी रुपयांनी बँकेतून कर्ज घेतले आहे मग शेतकऱ्यांच्या जमीन हात लावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहाणार नाही असे झाल्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना घराच्या बाहेर पडता येणार नाही असे ठणकावून सांगण्यात आले. यानंतर मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे शेतकऱ्यांचा मालाचे खुले लिलाव केले जातात परंतु खळ्यावर ती गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाचे वांधे काढले जातात काढून भाव कमी केला जातो वजन कमी केला जातो शेतकऱ्यांना अरेरावी केली जाते शेतकऱ्यांचे काटे मारले जातात.यावरती निफाड तालुका अध्यक्ष गजानन घोटेकर यांनी लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना निवेदन देऊन यासंदर्भात कल्पना देण्यात आली या प्रकारात बदल झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील काळात कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू शिरसाठ ,श्रावण देवरे, रवी शेवाळे ,कृष्णा जाधव, राम राजोळे ,गजानन घोटेकर ,रवींद्र तळेकर, मच्छिंद्र जाधव ,संजय जाधव ,ज्ञानेश्वर नरोडे, विठ्ठल जाधव, शरद शिलावर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.