तरुणांनी स्वयंरोजगार उद्योग व्यवसायातून आर्थिक सक्षम व्हावे- दशरथ गव्हाणे

निफाड प्रतिनिधी-(रामभाऊ आवारे)

तरुणांनी राजकीय, सामाजिक जीवनात कार्यरत असताना कौटुंबिक जबाबदारीही पार पाडावी.त्यामुळे तरुणांनी नवी दिशा-नवा विचार घेऊन स्वयंरोजगार उद्योग व्यवसायाकडे आपला कल वाढवला पाहिजे.उद्योग व्यवसायात प्रगती करून आर्थिक सक्षम झाले पाहिजे असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे यांनी केले ते मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड संघटनेच्या पुनर्बांधणी बैठकी प्रसंगी बोलत होते.प्रसंगी संघटनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य योगेश निसाळ,जिल्हाध्यक्ष रवींद्र दातीर, उपजिल्हाध्यक्ष प्रसाद डेमसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र दातीर यांनी संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून तरुणांसाठी स्वयंरोजगार उद्योजकाचे शिबिर आयोजित करण्यात येणार असून युवकांनी संभाजी ब्रिगेडचे विचार आत्मसात करून तळागाळातील तरुणांपर्यंत पोचवण्याचे काम करावे असे आवाहन केले.प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सोनवणे यांना संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली.यावेळी प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे, योगेश निसाळ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्ष हार्दिक निगळ,आजाद शेख, नीलेश पेलमहाले,प्रविण दातिर,संदीप आहेर, सनी निगळ, आकाश गायकवाड, पांडवराज डेमसे, राहुल गोडसे,हेमंत शेजवळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!