केळी पीक विमा प्रलंबित रक्कमेसाठी निंभोरा येथे लोकप्रतिनिधींना गांव बंदी.!

लोकप्रतिनिधी,विमा कंपनी वर रोष….

निंभोरा बु.प्रतिनिधी –

हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ८१ हजार केळी उत्पादकांनी पिक विमा काढला.
माञ अद्याप पर्यंत निम्मेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या केळी पिक विम्याची रक्कम मिळाली नाही. प्रशासन व विमा कंपनी पिकविम्या प्रकरणी दुर्लक्ष करत असल्याने या विम्यापासुन वंचित असलेल्या निंभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी श्रीराम मंदिर सभागृहात बैठक घेतली यांत लोकप्रतिनिधीवर रोष व्यक्त करण्यात आला.केळी पिक विमा रक्कम मिळेपर्यंत गावांत सर्व पक्षीय आमदार, खासदार मंत्री,यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत करण्यात आला.
निंभोरा बु.सरपंच सचिन महाले, तंटामुक्ती अध्यक्ष डिगंबर चौधरी, सदस्य सौ.मंदाकिनी बऱ्हाटे, ललित कोळंबे, सचिन चौधरी, प्रशांत पाटील, वाल्मिकी पवार, हेमंत पवार, ज्ञानदेव नेमाडे, सदस्य अमोल खाचणे, अनिल बऱ्हाटे, संजय धांडे, कन्हैया भारंबे,शांताराम चौधरी,सयाजी पवार, शब्बीर मोहिद्दीन पटेल, सतिष पाटील, बाळु दामु पाटील, इसा पटेल, जितेंद्र चौधरी, प्रकाश दोडके, सुरेश मनुचारी, दिलीप चौधरी, बाळु दोडके, हरेश्वर चौधरी, भिकन बोंडे,सुधिर मोरे,सलिम पटेल,सुरेंद्र सोनवणे, नरेंद्र दोडके, विजय माळी,माधव बऱ्हाटे, युवराज बऱ्हाटे, विजय पवार, द्रोपदाबाई दोडके, विलास भोगे, अनिल दोडके, कुंदन भोगे, नोमदास भिरुड, चंद्रकांत चौधरी, मधुकर भोगे, सौ.ललिता हेमंत चौधरी, पञकार राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, प्रमोद कोंडे यासह परिसरातील शेतकरी ग्रामपंचायत कर्मचारी ही या बैठकीत उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!