‘रियल टाइम’ नोंदणी करण्याची सुविधा, ई – पीक नोंदणी

निंभोरा बु प्रतिनिधी – ( प्रमोद कोंडे.9922358586 )

पीकपाहणीची अचूक नोंद करण्यासाठी शासनाने ‘ माझा सातबारा, मीच नोंदविणार पीक पेरा ‘ ही मोहीम हाती घेऊन 15 ऑगस्ट पासून महाराष्ट्र राज्यात ई – पीकपाहणी सुरु केली आहे.जळगांव जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी ई – पीक नोंदी करून आघाडी घेतली आहे.

महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यावर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेतजमिनीची प्रतवारी, दुष्काळ, अतिवृष्टी,किंवा वादळामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे सहज शक्य होते. या पिकनोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज ही दिले जाते. अगोदर दोन ते तीन गावांमध्ये एकच तलाठी असल्याने पीक पाहणी अचूक नोंदवली जात नसल्याचा शेतकऱ्यांचा नेहमी तलाठी यांच्यावर रोष, आक्षेप होता. ही बाब लक्षात घेत आता महसूल विभागाने पिकांची “रियल टाइम” नोंदणी करण्याची सुविधा थेट शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्वात अधिक खातेदारांची नोंदणी जळगांव जिल्ह्यात एक लाख तीस हजाराच्या वर शेतकऱ्यांनी केली आहे.तर औरंगाबाद येथे सर्वात कमी 14 हजार शेतक-र्यांनी नोंदणी केली आहे.

ई – पीक पाहणी प्रकल्प याला रावेर तालुक्यात ही चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्षेत्रीय स्तरावरून महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पीक नोंदणी बाबत मार्गदर्शन करीत आहेत. रावेर तालुक्यातील निंभोरा बु. येथे ही चांगला प्रतिसाद ई – पीक नोंदणीस भेटत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!