खेळांमध्ये नैपुण्य असलेल्या नागरी सेवेतील अधिकार्‍यांचा क्रीडा प्रशासनात समावेश करायला हवा: हॉकी ऑॅलिम्पिकपटू डॉ. एम. पी . गणेश

नवी दिल्ली प्रतिनिधी

30 जुलै

टोकियो ऑॅलिम्पिक सुरु असून संपूर्ण देश क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी उत्सुक आहे. याच अनुषंगाने पत्र सूचना कार्यालय (पीआयबी) आणि प्रादेशिक लोक संपर्क विभाग (आरओबी) चंदीगड यांनी आज ’क्रीडा क्षेत्रात महिला ’ या विषयावर वेबिनार आयोजित केले होते. ऑॅलिम्पियन आणि भारतीय पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार डॉ. एम पी गणेश, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार अंजुम चोप्रा हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रख्यात खेळाडू अतिथी वक्ते म्हणून सहभागी झाले होते. हे दोन्ही वक्ते त्यांच्या क्षेत्रातील पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त खेळाडू आहेत.

आपल्या स्वागतपर भाषणात पीआयबी, चंदीगडच्या अतिरिक्त महासंचालक देवप्रीत सिंग यांनी आपल्या मार्गात येणार्‍या विविध अडथळ्यांवर मात करून देशाचा गौरव वाढवणार्‍या महिला खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले.

डॉ. मुलेरा पूवय्या गणेश हे भारतीय संघाचे प्रशिक्षकही होते आणि 1973 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2020 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेत्यांना गौरवण्यात आले होते. अंजुम चोप्रा या क्रिकेट विेषक असून भारतातील दूरचित्रवाणीवरील पहिल्या महिला समालोचक आहेत. त्यांच्या कामगिरीबद्दल 2007 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये क्रीडा हा अनिवार्य विषय बनवायला हवा, यामुळे भारताला प्रतिभावान खेळाडू तयार करण्यास मदत होईल, असे गणेश म्हणाले. प्रशासनात क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले , ‘खेळांमध्ये नैपुण्य असलेल्या नागरी सेवेतील अधिकार्‍यांचा क्रीडा प्रशासनात समावेश करायला हवा..‘

श्रोत्यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना अंजुम म्हणाल्या, फप्रत्येकाला प्रोत्साहनाची गरज आहे, मग तो पुरुष असो किंवा महिला खेळाडू असेल. मात्र पुरुष आणि महिलांचे जग वेगळे आहे. खेळ सामान्यत: पुरुषांशी संबंधित मानले जातात. आमची पिढी ही धारणा बदलेल. ङ्ग

एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, अभिनेता किंवा समालोचक यापैकी कुठल्या भूमिकेने सर्वात जास्त आनंद दिला, यावर उत्तर देताना अंजुम म्हणाल्या ‘इंडिया ब्लेझर मिळवणे आणि परिधान करणे हा माझा सर्वात मोठा सन्मान होता ‘.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!