सिंडिकेट बँक धोकाधडी प्रकरणात ईडीकडून 4.9 कोटी रुपयांची संपत्ती कुर्क

नवी दिल्ली प्रतिनिधी

28जुलै

सिंडिकेट बँक धोकाधडी प्रकरणात  प्रवर्तन निदेशालय (ईडी) ने बुधवारी विजय आकाश, मोहम्मद मुस्तफा, एम.डी.जयराम आणि अन्य जणांची एकूण 4.98 कोटी रुपयांची संपत्त्ती कुर्क केली असल्याचे ईडीने सांगितले.

ईडीने एका निवेदनात म्हटले की आम्ही धन शोधन निवारण अधिनियम (पीएमएलए) च्या अंतर्गत संपत्तींना कुर्क केले आहे.

निवेदनात ईडीने म्हटले की ईडीने कर्नाटकच्या बेंगळूरमधील कमर्शियल स्ट्रीट पोलिस स्टेशनद्वारा सिंडीकेट बँकेचे तत्कालीन सहाय्यक शाखा व्यवस्थापक आकाश, मुस्तफा, जयराम, बेंगळूरुमधील  उत्तरहल्ली शाखा आणि अन्य जणांच्या विरोधात दाखल प्राथमिकीच्या आधारावर मनी लॉड्रिंगचा गुन्हा नोंदविला आहे.

यामध्ये सांगण्यात आले की तपासातून माहिती पडले की जयराम, नागराजू, रेवेना, सिध्दगंगैया आणि अन्य जणां बरोबर मिळून पूर्ण षडयंत्राचा मास्टरमाइंड आकाशने मुस्तफाद्वारा संचालित कर्नाटक राज्य कृषी वितरण बोर्ड (केएसएएमबी) च्या नावावरुन सिंडीकेट बँकेत एक बनावट चालू खाते उघडले.

बोर्डचे आयडी कार्ड, केएसएएमबीचे लेटर हेड आदी सारखे बनावट आणि मनगढंत दस्तऐवजांच्या आधारावर केएसएएमबीचे खाता अधिकारीच्या रुपात प्रतिरुपण करत बनावट चालू खात्यात 50 कोटी रुपये स्थानांतरीत करण्यात यशस्वी राहिले.

निवेदनानुसार मुस्तफाने जयराम आणि अन्य जणांच्या मदतीने केएसएएमबीच्या बनावट चालू खात्यात 50 कोटी रुपयांची उक्त रक्कम प्राप्त केल्यानंतर 47.96 कोटी रुपये विविध संस्था, व्यक्ती आादींच्या संबंधीत विविध बँक खात्यांमध्ये स्थानांतरीत केले.

तपासातून माहिती पडले की अशा संस्था आणि व्यक्तींपैकेी प्रत्येकाच्या बँक खात्यांचा वापर नगदीच्या रुपात पैसे काढणे आणि आरोपी आणि त्यांच्या सहयोगीद्वारा दागिणे व जमिनी खरेदी करण्यासाठी केला गेला होता.

यामध्ये सांगण्यात आले की मनी लॉन्ड्रिंग, दागिणे आणि जमिनीसाठी वापरण्यात आलेले बँक खात्यातील शेष रक्कमेच्या रुपात ओळख करण्यात आलेली संपत्ती 4.98 कोटी रुपयाची चल आणि अचल संपत्तींच्या रुपात पीएमएलएच्या अंतर्गत अस्थायीपणे संलग्न करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!