दिल्ली सीमेवरुन बॅरिकेटना हटविणे सुरु, स्थितीचा आढावा घेण्यासाठी विशेष सीपी दीपेंद्र पाठकांकडून पाहणी

नवी दिल्ली,

केंद्रिय कृषी कायद्यांच्या विरोधात मागील 11 महिन्यां पासून दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान रस्त्याला बंद करण्यासाठी लावलेल्या बॅरिकेटला दिल्ली पोलिसांनी हटविण्यास सुरुवात केली आहे. गाझीपूर सीमेवरील बॅरिकोडिंग हटविण्याच्या दरम्यान दिल्ली पोलिसचे विशेष सीपी (कायदा व सुव्यवस्था) दीपेंंद्र पाठक सीमेवर पोहचले व स्थितीचा आढावा घेतला.

सीपी दीपेंद्र पाठक यांनी म्हटले की दिल्ली पोलिसांकडून एक पुढकार घेतला गेला आणि आम्हांला वाटते की हायवेवरील वाहतुक सुरु व्हावी. प्रदर्शनकर्त्यां बरोबर आम्ही संपर्कात आहोत आणि आम्ही त्यांना विनंती करत आहोत.

शेतकर्‍यांना आता माघारी जाण्यासाठी सांगितले जाईल का ? असे विचारले असता पाठक यांनी म्हटले की चर्चेतूनच यावर समाधान काढले जाईल. आम्ही आपल्या पुढकारातून रस्त्ता मोकळा करण्यास सुरुवात केली आहे.

शेतकर्‍यांनी म्हटले की रस्त्याला मोकळे केल्यानंतर ते दिल्लीकडे जातील. यावर सीपी पाठक यांनी म्हटले की ज्यावेळी कधी अशी स्थिती निर्माण होईल तर आम्ही याला आपल्या व्यवसायीक पध्दतीने निपटवूत. आम्ही शेतकर्‍यांना विनंती करुत आणि सांगूत की रस्ता बंद होण्याच्या कारणामुळे लोकांना परेशानी होत आहे.

बॅरिकेडला हटविल्यानंतर गाजियाबाद-नोएडाहून दिल्लीला जाणार्‍या लोकांना खूप दिलासा मिळेल. हायवे बंद होण्याच्या कारण वाहनाना खूप लांबून फिरवून जावे लागत आहे. यामुळे वीस मिनिटाच्या प्रवासासाठी अडिच तासाचा वेळ लागत आहे.

दिल्ली सीमेवर लावण्यात आलेल्या बॅरिकेटला जेसीबीच्या मदतीने हटविले जात आहे. या व्यतिरीक्त पोलिस रस्त्यावर लावलेल्या बनावट खेळ्यांनाही हटवत आहे. क्रॉक्रिटच्या भिंतीलाही तोडण्याचे काम सुरु आहे यामुळे रस्त्यावर परत एकदा वाहनांची वाहतुक सुरु होऊ शकेल.

दिल्ली सीमेवर मोठया संख्येत पोलिस दलाची तैनाती करण्यात आली आहे तर वरिष्ठ अधिकारी स्थितीवर नजर ठेवून आहेत. सध्या दिल्लीच्या साीमांवर कृषी कायद्याच्या विरोधातील प्रदर्शन हे मागील 11 महिन्यांपासून सुरु आहे. मात्र या रस्त्यांना मोकळे केले तरी शेतकर्‍यांचे विरोध प्रदर्शन सुरु राहिल.

दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या सीमांवरील प्रदर्शनावर म्हटले होते की केंद्राच्या कृषी कायद्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे परंतु ते अनिश्चितकाळासाठी रस्ता बंद करु शकत नाहीत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!