आज पुन्हा कडाडले पेट्रोल-डिझेलचे दर; मुंबईत पेट्रोल 112, तर डिझेल 102 पार

नवी दिल्ली

देशात सलग पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये सातत्यानं होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी मंगळवारी 20 ऑॅक्टोबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 0.35 पैशांची वाढ झाली आहे. देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर या दरवाढीनंतर डिझेलचे दर 94.92 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 112.11 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही 102.89 रुपयांनी विकलं जात आहे. मुंबईत डिझेलच्या दरांमध्ये 0.37 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरांमध्ये 0.34 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 103.01 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.

आठवडाभरात कितीनं महागलं पेट्रोल-डिझेल?

गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या दरांत 1.70 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलची किंमत 1.75 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ब-ेंट कच्चं तेल 84.8 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. ब-ेंट कच्चं तेल सात वर्षांनी पहिल्यांदाच एवढं महाग झालं आहे.

देशातील प्रमुख महानगरांतील दर :

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपयेलिटर डिझेल रुपयेलिटर

दिल्ली 106.19 94.92

मुंबई 112.11 102.89

कोलकाता 106.77 98.03

चेन्नई 103.31 99.26

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!