’अजून मैदान सोडलं नाही’, आयपीएल मधून निवृत्तीच्या चर्चांना धोनीकडून पूर्णविराम!
नवी दिल्ली
आयपीएल 2021 चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यानं आयपीएलमधील निवृत्तीबाबतच्या चर्चांवर भारी उत्तर दिलंय. अंतिम सामना संपल्यानंतर पुरस्कार वितरण सोहळ्यात समालोचक हर्षा भोगले यांनी धोनीला याबाबत विचारलं असता धोनीनं मिश्किलपणे हसत म्हटलं की, आपण अजून सोडलेलं नाही… धोनीच्या या उत्तरानंतर तो पुढील आयपीएलमध्येही खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हर्षा भोगले यांनी धोनीला विचारलं की, आपण मागे सोडून जात असलेल्या वारशाचा तुला अभिमान वाटत असेल? यावर धोनीनं हसत म्हटलं की, आपण अजून सोडलेलं नाही!
घ्झ्थ् 2021 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (ण्एख्) ने कोलकाता नाईट रायडर्स (ख्ख्ीं) ला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (ण्एख्) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स (ख्ख्ीं) ला 193 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात कोलकाता संघ निर्धारित 20 षटकांमध्ये 9 विकेट गमावून फक्त 165 धावा करू शकला. चेन्नईच्या विजयाचा नायक फाफ डु प्लेसिस होता, ज्याने नाबाद 86 धावांची खेळी करत चेन्नईला मोठी धावसंख्या उभारुन दिली. डु प्लेसिस व्यतिरिक्त चेन्नईचा सलामीवीर ॠतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली.
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, आकडेवारी पाहिली तर कामगिरीत सातत्य राखणार्यांमध्ये आम्ही प्रथम आहोत, पण आम्ही अंतिम सामन्यातही पराभूत झालो आहोत. विरोधी संघाला संधी न देणं या गोष्टीत जाणुनबुजून सुधारणा करण्यात आली. आगामी वर्षांमध्ये चेन्नई त्यासाठी ओळखली जाईल अशी आशा आहे. खासकरुन प्रत्येकाशी स्वतंत्र चर्चा होते. जेव्हा तुम्ही टीम रुममध्ये बोलता तेव्हा दबाव निर्माण होतो. तुम्ही चांगल्या संघाशिवाय चांगली कामगिरी करु शकत नाही. आमच्याकडे चांगले खेळाडूही आहेत, असं धोनी म्हणाला.
धोनी म्हणाला की, मला चाहत्यांचे आभार मानायचे आहेत. आम्ही सध्या दुबईत आहोत. मात्र जेव्हा दक्षिण आफ्रिकेत होतो तेव्हाही मोठ्या प्रमाणात चाहते होते. जणू काही आम्ही चेपॉक, चेन्नईत खेळत आहोत असं वाटत होतं, असंही धोनी म्हणाला. कोलकात्याच्या संघाचंही धोनीनं कौतुक केलं. तो म्हणाला की, मी चेन्नईबद्दल बोलण्यापूर्वी, मी कोलकाताबद्दल आधी बोलेन. दबावात असताना पुनरागमन करणं कठीण असतं. मात्र त्यांनी चांगली कामगिरी केली. जर आयपीएल जिंकण्यासाठी कोणता संघ पात्र असेल तर तो कोलकाता आहे, असं धोनी म्हणाला.