आजपासून 256 जिल्ह्यात सोन्याचे हॉलमार्किंग अनिवार्य. अकोला, अमरावती, धुळे, लातूर, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, नागपूर, पालघर, रायगड, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, पुणे, मुंबई यांचा समावेश

नवी दिल्‍ली, 16 जून 2021

भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) चे महासंचालक श्री. प्रमोद कुमार तिवारी,यांनी आज आभासी माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य योजना 16 जून 2021 पासून अंमलात आल्यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली.

भारतीय मानक ब्यूरो (बीआयएस) चे महासंचालक अनिवार्य हॉलमार्किंगच्या विविध पैलूंबद्दल माहिती  देताना म्हणाले की,  जिथे मूल्यमापन आणि हॉलमार्किंग केंद्रे आहेत त्या देशातील 256 जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला  सोन्याच्या दागिन्यांवर अनिवार्य हॉलमार्किंग सुरू केले आहे. ते पुढे म्हणाले की, ज्या सराफांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना अनिवार्य हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येईल. भारत सरकारच्या व्यापार धोरणानुसार दागिन्यांची निर्यात आणि पुनर्रआयात – आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांसाठी दागिने, शासकीय मान्यताप्राप्त बी 2 बी देशांतर्गत प्रदर्शनांसाठीच्या दागिन्यांनाही अनिवार्य हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येईल. घड्याळे, फाउंटन पेन आणि दागिन्यांचे विशेष प्रकार उदा. कुंदन, पोल्की आणि जडाऊ यांना हॉलमार्किंगमधून सूट देण्यात येणार आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, सराफांची  नोंदणी एकदाच  होईल आणि या नोंदणीसाठी सराफांकडून  कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मौल्यवान धातूंच्या वस्तूंच्या विक्रीशी संबंधित कोणताही उत्पादक, आयातदार, घाऊक विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेता यांना बीआयएसकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. मात्र नोकरीच्या आधारावर सोन्याचे दागिने तयार करणारे आणि साखळीतील कोणाशीही थेट विक्रीशी संबंधित नाहीत त्या कारागीर किंवा उत्पादकांना  नोंदणीतून  सूट देण्यात आली आहे.

भारतीय मानक ब्यूरो च्या महासंचालकांनी माहिती देताना  सांगितले की,  हॉलमार्कच्या पहिल्या टप्प्यात  उत्पादक, संपूर्ण विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेते  असू शकतात. सोन्याच्या शुद्धतेची जबाबदारी घेऊन हॉलमार्क केलेल्या दागिन्यांमध्ये 2 ग्रॅम पर्यंत वाढ किंवा घट यासंदर्भात  सराफांना परवानगी देण्यात आली आहे.

ते पुढे म्हणाले की, हॉलमार्किंगसाठी सोन्याच्या शुद्धतेच्या श्रेणी वाढविण्याची मागणी सराफांकडून वाढली आहे. हे लक्षात घेता, हॉलमार्किंगसाठी अतिरिक्त कॅरेट्स म्हणजेच 20, 23 आणि 24 कॅरेटलाही अनुमती असेल.

हे स्पष्ट करण्यात आले आहे की, घरांमध्ये उपलब्ध हॉलमार्क नसलेले जुने दागिने सराफांना विकता येतील. श्री तिवारी यांनी सांगितले की, सराफ ग्राहकांकडून हॉलमार्कशिवाय जुने  सोन्याचे दागिने परत खरेदी करणे सुरु  ठेवू शकतात आणि सोन्याचे दागिने उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना पुरेसा वेळ देण्यासाठी ऑगस्ट अखेरपर्यंत कोणताही दंड आकारला जाणार नाही.

ए अ‍ॅन्ड एच सेंटरच्या वर्कफ्लो ऑटोमेशनबद्दल माध्यमांना माहिती देताना भारतीय मानक ब्यूरोचे  महासंचालक म्हणाले की, दागिन्यांची प्राप्तीपासून ते हॉलमार्किंगपर्यंतची प्रत्येक कामे  संगणकीकृत केली जातील  आणि प्रत्येक कामाची तारीख आणि  वेळ असलेली संपूर्ण माहिती ठेवली जाईल.ते म्हणाले की, हॉलमार्किंगच्या टप्प्यापर्यंत जॉब नंबर नोंदवूनही नमुन्याबद्दल गुप्तत्ता  ठेवणे आवश्यक आहे.ते म्हणाले की, आतापासून हॉलमार्कमध्ये सहा-अंकी कोडसह बीआयएस चिन्ह आणि शुद्धता आणि अत्यंत पारदर्शकतेसाठी सराफाला  देण्यात येणाऱ्या  वितरण वाउचरचा समावेश असेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!