’बजरंगी भाईजान’ फेम खर्या चांद नवाबच्या ”कराचीसे” व्हिडिओला 46 लाखांची बोली
नवी दिल्ली,
जवळपास प्रत्येक बॉलिवूड प्रेमीने सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेला ”बजरंगी भाईजान” हा चित्रपट पाहिला असेल. हा चित्रपट केवळ सलमान खानसाठीच नव्हे तर नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अप्रतिम अभिनयासाठीही प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहील.
या चित्रपटात नवाजुद्दीनचा एक संस्मरणीय सीन आहे, कराची रेल्वे स्टेशवरील रिपोर्टिंगचा. चांद नवाब या पत्रकाराची भूमिका यात नवाजने साकारली होती. यात चांद नवाब बोलत असताना मध्येच प्रवासी कॅमेर्याच्या फ्रेममध्ये घुसतात. मग परत एकदा चांद रिटेक करायला सुरूवात करतो. पण पुन्हा प्रवासी मध्ये येतात..असे सतत घडल्यामुळे चांद नवाब वैतागतो. ”बजरंगी भाईजान” चित्रपटातील नवाजुद्दीनने साकारलेला हा अप्रतिम सीन प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळवून गेला. खरंतर नवाजने साकारलेली चांद नवाब ही व्यक्तीरेखा खरी आहे. त्याचे कराची रेल्वे स्टेशनवरील रिपोर्टिंगही खरे आहे. पाकिस्तानी पत्रकार असलेला चांद नवाबचा त्यावेळचा व्हिडिओ 2008 मध्ये प्रचंड व्हायरल झाला होता.
”बजरंगी भाईजान”नंतर प्रसिध्दीस आलेला पाकिस्तानी पत्रकार चांद नवा आता पुन्हा चर्चेत आला आहे तोही त्यांच्या त्याच व्हायरल व्हडिओमुळे. त्यांचा तो ’कराचीसे लाईव्ह’ व्हिडिओ फाऊंडेशन अॅपवर एक नॉन फंगेबल टोकन च्या स्वरुपात विक्रीसाठी ठेवण्यात आलाय.
आपल्या माहिती करीता हा एक असा मंच आहे की ज्यातून डिजिटल निर्मात्यांना त्यांच्या डिजिटल कलाकृतीद्वारे (वळसळींरश्र रीीुेींज्ञ) पैसे कमविण्यास मदत करीत असतो. चांद नवाबचा व्हायरल व्हिडिओ खरेदी करण्यासाठी किमान बोलीची किंमत 20 एथेरियम टोकन किंवा सुमारे 46,74,700 रुपये इतकी आहे.
लिलावाच्या व्यासपीठावर चांद नवाबने लिहिलंय की, ‘मी चांद नवाब आहे, व्यवसायाने पत्रकार आणि रिपोर्टर. 2008 मध्ये, यूट्यूबवर माझा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये मी रेल्वे स्टेशनवर ईद सणाचे रिपोर्टिंग करताना अडखळलो होतो. अहवाल देताना लोकांनी मला अनेक वेळा व्यत्यय आणला, माझ्या गोंधळलेल्या आणि सतत चिडचिडेपणामुळे या व्हिडिओला यूट्यूब आणि फेसबुकवर लाखो व्ह्यूज मिळवले. ते खूप व्हायरल झाले.
भारत आणि पाकिस्तान विशेषत: बॉलिवूड स्टार सलमान खान आणि बजरंगी भाईजानच्या इतर अभिनेत्यांकडून भरपूर प्रेम आणि कौतुक मिळाल्यानंतर मी एका रात्रीत प्रसिद्ध पावलो.‘
वाचकांच्या माहितीकरीता, हा व्हिडिओ 2008 मध्ये शूट आणि अपलोड करण्यात आला होता. त्या वेळी नवाब कराची पाकिस्तान येथील एका वृत्तवाहिनीसोबत होते आणि ते ईदच्या सणाच्यावेळी कराचीतील एका रेल्वे स्टेशनच्या पायर्यांवरुन रिपोर्टिंग करण्याचा प्रयत्न करत होते. जिथे त्यांना प्रवाशांकडून वारंवार अडथळा आणला जात होता. यामुळे ते वैतागले होते. त्यांच्या चेहर्यावरील त्रागा आणि रिपोर्टिंग करताना उडालेला गोंधळ यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.