अफगाणिस्तानच्या अध्यक्षपदासाठी सालेह यांच्या उमेदवारीला अमेरिकेचा पाठिंबा

नवी दिल्ली,

अफगाणिस्तानचे पहिले उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणून घोषित केले आहे. त्यांच्या या कृत्याला अमेरिकेच्या शीर्ष धोरण विेषकाने पाठिंबा दिला आहे. यासाठी त्याने अफगाणिस्तानच्या संविधानाचा हवाला दिला आहे.

मायकल जॉन्स, असे या विेषकाचे नाव आहे. मायकल हे नॅशनल टी पार्टी मुव्हमेंटचे सहसंस्थापक आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे माजी भाषण लेखही आहेत. त्यांनी टिवटरवर सांगितले की, 2004 साली स्वीकारण्यात आलेले अफगाणिस्तानचे संविधान सध्याच्या घडीला देशात जी परिस्थिती उदयास आली आहे, त्यावर राष्ट्र शासनास मार्गदर्शन करते. अशा परिस्थितीत, पहिले उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्याकडे अध्यक्षपद जाते. राष्ट्राने कायद्याचा आदार केला पाहिजे, हिंसेचा नाही.

सालेह यांनी मायकल यांचे हे टिवट शेअर करून आपली विश्वासार्हता ठामपणे व्यक्त केली आहे. सालेह सध्या अगाणिस्तानच्या पंजशीर खोर्‍यात आश्रयास आहेत. ते अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद यांच्याबरोबर तालिबान विरोधी शक्तींना बळकट करत आहेत.

देशाने कायद्याचा आदर केला पाहिजे, हिसेचा नाही. पाकिस्तानला गिळण्यासाठी अफगाणिस्तान खूप मोठा आहे आणि ते तालिबान्यांना शासन करण्यासाठी देखील मोठे आहे. तुमच्या इतिहासात दहशतवादी गटांपुढे झुकने आणि अपमाणीत होणे याबद्दलचा अध्याय होऊ देऊ नका, असा संदेश देखील सालेह यांनी टिवटद्वारे अफगाणिस्तानच्या जनतेस दिला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. पंजशीर येथे तालिबानला रोखण्याची तयारी सुरू आहे. पंजशीर हे त्या 34 प्रांतांपैकी एक आहे ज्यावर तालिबानला कब्जा करता आला नाही.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!