पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक (बुके ऐवजी बुक) हे उपक्रम राज्यभरात राबविण्यात यावा- शेख अब्दुल रहीम
औरंगाबाद प्रतिनिधी
राज्यभरात शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात “पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक” हे उपक्रम राबविण्यात यावे. कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमात “पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तक” ही प्रथा सर्वानी स्वीकारले तर पुस्तकाचे महत्व ही वाढेल व वाचनाची आवड निर्माण होईल. बुके ऐवजी बुक या संदर्भात अनेक शासन निर्णय निघाले परंतु आज पर्यंत यावर अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून आपण या वर विशेष लक्ष केंदित करून कमीत कमी शैक्षणिक सरकारी कार्यालयात तसेच शाळा, महाविद्यालयात ही प्रथा सर्वानी स्वीकरावी या साठी आपल्या मार्फत सर्वाना पत्र काढून आदेशीत करावे ही कळकळीची विनंती. भारत रत्न, भारताचे राष्ट्रपती डॉ.ए.पी जे कलाम सर, तसचे पुस्तक प्रेमी आणि कायदे पंडित भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा उपक्रम राज्यभर राबवून या वर्षी आगळी वेगळी श्रद्धांजली वाहण्यात यावी. अशी मांगणी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त साहेब, तसेच शिक्षणसंचालक (प्राथमिक व माध्यमिक) यांच्याकडे इमेल आणि व्हाट्सएप द्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, राज्य उपाध्यक्ष शफीक पठाण, संस्थापक सचिव शेख शब्बीर तसेच औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सय्यद ताजीमोद्दीन सर यांच्या स्वाक्षरी आहे…