समुद्रामध्ये अडकलेल्या भारतीय जहाजावरील चालक दलाच्या नऊ सदस्यांना वाचविले

चेन्नई,

तांत्रीक खराबीच्या कारणामुळे समुद्रामध्ये अडकलेल्या एका भारतीय जहाजाच्या चालक दलांच्या सदस्य (क्रू-मेंबर्स) ना वाचविण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने यशस्वीपणे अभियान चालविले.

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) द्वारा भारतीय तटरक्षक दलाच्या परामर्श बरोबर विकसीत एका संकट चेतावनी ट्रॉसमीटर (डीएटी) ने खोल समुद्रात एक यंत्रीकृत जहाजावरील नऊ नाविकांना वाचविण्यात यश मिळविले आहे.

तटरक्षक दलाने बुधवारी सांगितले की चेन्नईमध्ये त्यांच्या समुद्री बचाव समन्वय केंद्र (एमआरसीसी) ने मॅकेनाइज्ड सेलिंग वेसल (एमएसव्ही) च्या नऊ चालक दलाच्या सदस्यांना वाचविण्याच्या अभियानाचे यशस्वीपणे समन्वय केला आहे. हवामान खराब असल्याच्या कारणामुळे जहाज अन्नई वेलंकने अरोकिया वेन्निलाने तंत्रीक खराबीची माहिती दिली होती.

तूतिकोरिनहून मालदीवला जाण्याच्या दरम्यान जहाजने तंत्रीकी खराबीची सूचना दिली. त्यावेळी ते तूतीकोरिन पासून जवळपास 170 समुद्री मैल आणि मालदीव पासून 230 समुद्री मैल दूर होते. जहाजाने संकट संबंधी संदेश पाठवून मदतीची विनंती केली यानंता बचाव अभियान सुरु करण्यात आले.

एमआरसीसी, चेन्नईला मंगळवारी संध्याकाळी जवळपास 4 वाजता या संकटाच्या संबंधातील एक संदेश मिळाला. यानंतर एमआरसीसीने राष्ट्रीय शोध आणि बचाव सेवा सुरु केले. तसेच शोध आणि बचाव अभियानामध्ये समन्वयासाठी इंटरनॅशनल सेफ्टी नेटला सक्रिय केले. या अभियानामध्ये बुधवारी सकाळी चालक दलाने सर्व नऊ सदस्यांना सुरक्षीत वाचविले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!