उत्तर प्रदेश : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रियंका गांधी लखनऊ दौर्‍यावर

लखनऊ,

काँग-ेसच्या महासचिव प्रियंका गांधी आपल्या निवडणुक दौर्‍यावर सोमवारी लखनऊला पोहचल्या असून पक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या सोमवारी लखनऊमधील आपले निवास स्थान कौल हाऊसमध्ये राहणार आहेत.

लखनऊ दौर्‍यावर पोहचलेल्या काँग-ेसच्या महासचिव प्रियंका गांधी मंगळवारी पक्षाच्या स्क्रीनिंग कमेटी आणि परामर्श समिती बरोबर बैठक करतील. प्रियंका आपल्या दौर्‍यात पक्षाच्या आगमी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील आणि पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां बरोबर निवडणुक रणनीतीवर आणि महागाई, बेरोजगारी आणि अन्य मुद्दांवर चर्चा करतील.

प्रिंयका याच्या आधी 9 सप्टेंबरला लखनऊच्या तीन दिवशीय दौर्‍यावर आल्या होत्या. काँग-ेस पक्ष 7 ऑक्टोंबर पासून उत्तर प्रदेशमध्ये प्रतिज्ञा यात्रा सुरु करणार आहे.

काँग-ेसचे प्रवक्ते बृजेंद्र सिंहनी सांगितले की पितृपक्षाच्या कारणामुळे या यात्रेला पुढे ढकले आहे. अनेक वरिष्ठ नेत्यांचे मत होते की पितृपक्षात यात्रेची सुरुवात करणे योग्य नाही आणि याला नवरात्रामध्ये सुरु केले पाहिजे. यामुळे पक्ष आता 7 ऑक्टोंबरला लक्षात ठेवून यात्रेची तयारी करत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!