पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
नवी दिल्लीमुंबई,
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती भारताने गेल्या 24 तासात 61,15,690 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 75.89 कोटीपेक्षा जास्त मात्रा (75,89,12,277) दिल्या आहेत. एकूण 76,68,216 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.
गेल्या 24 तासात 38,012 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,25,22,171 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.62म.झाला आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,51,087 आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.05म आहेत.
सलग 80 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे. गेल्या 24 तासात 27,176 नव्या रुग्णांची नोंद झाली.
चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 16,10,829 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 54.60 कोटीहून अधिक (54,60,55,796) चाचण्या केल्या आहेत. देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.00म असून गेले 82 दिवस 3म पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.69म असून गेले 16 दिवस 3म पेक्षा कमी आणि 99 दिवस 5म पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस :
राज्येकेंद्रशासित प्रदेशांना सर्व स्त्रोताद्वारे 74.25 कोटींपेक्षा जास्त लसींच्या मात्रा पुरवल्या आहेत. आणखी 1.8 कोटी मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.