भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 63.43 कोटी मात्रांचा टप्पा

मुंबई,

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत भारताने गेल्या 24 तासात 31,14,696 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत 63.43 कोटीपेक्षा जास्त मात्रा (63,43,81,358) दिल्या आहेत. एकूण 68,14,305 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 34,763 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,19,23,405 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून बरे होण्याचा दर 97.51 झाला आहे.

सलग 64 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 42,909 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,76,324 आहे.उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णांच्या 1.15 म आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 14,19,990 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 52.01कोटीहून.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!